Home पुणे जुन्नर तालुक्यातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व मृत्यूच्या गंभीर प्रकरणात आज शिवसेना नेत्या...

जुन्नर तालुक्यातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व मृत्यूच्या गंभीर प्रकरणात आज शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले.●पीडित कुटुंबाच्या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोन; न्याय व सुरक्षेची ग्वाही*

65
0

:*जुन्नर प्रकरण: पीडित कुटुंबाच्या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोन; न्याय व सुरक्षेची ग्वाही*

*जुन्नर | MAI Media 24 – दि. २२ ऑगस्ट २०२६*

जुन्नर तालुक्यातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व मृत्यूच्या गंभीर प्रकरणात आज शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले.

*मोठी अपडेट:*
डॉ. गोऱ्हे कुटुंबाशी संवाद साधत असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट फोनवरून पीडित कुटुंबाशी संवाद साधला. “कुटुंब एकटे नाही, शासन खंबीरपणे पाठीशी आहे. आरोपीला कठोर शिक्षा मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होतील,” अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.

*डॉ. गोऱ्हे काय म्हणाल्या?*
– पुणे ग्रामीण SP संदीप गिल यांच्याकडून तपासाची माहिती घेतली
– नसरापूर पॅटर्नप्रमाणे भक्कम पुरावे, फॉरेन्सिक, तांत्रिक पुरावे कोर्टात मांडावेत
– आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा मिळावी यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा

*पीडित कुटुंबाच्या मागण्या:*
अवैध दारू विक्री बंद, सुरक्षित वातावरण, मुलांच्या शिक्षणासाठी मदत.

*पिंपळवंडी पॅटर्नची गरज:*
ग्रामीण भागात कम्युनिटी पोलिसिंग मजबूत करावी. आमदार शरद सोनवणे यांनी पिंपळवंडी पोलीस ठाणे सक्षम करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा डॉ. गोऱ्हे यांनी उल्लेख केला. पोलीस, ग्रामपंचायत, शाळा, सामाजिक कार्यकर्ते यांच्या सहभागातून ‘पिंपळवंडी पॅटर्न’ विकसित करण्याची गरज व्यक्त केली.

> “केवळ मुलींना सावध करणे पुरेसे नाही. मुलांमध्ये महिलांचा सन्मान, संमतीचे महत्त्व याबाबत प्रबोधन हवे. ऑनलाइन गेम्समधील हिंसक कंटेंट हे नवे आव्हान आहे,” – डॉ. नीलम गोऱ्हे

*यावेळी उपस्थित:* आमदार शरद सोनवणे, जिल्हाप्रमुख देवीदास दरेकर, मंगेश पाटील, सरपंच मेघा काकडे आदी.

#Junnar #NeelamGorhe #EknathShinde #MAIMedia24 #PuneGrural

*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here