*शतकमहोत्सवी साहित्य संमेलनात युवा पिढी केंद्रबिंदू ठरावी – मराठी भाषा मंत्री उदय सामंत*
*पुणे | MAI Media 24*
शतकमहोत्सवी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात युवा पिढीचा सहभाग हा संमेलनाचा केंद्रबिंदू ठरावा, यासाठी आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सभागृहात महत्त्वपूर्ण बैठक मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी घेतली.
१०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात राज्यातील सर्व महाविद्यालयीन युवक व विद्यार्थ्यांचा सक्रीय सहभाग सुनिश्चित करण्यासाठी राज्यातील सर्व अकृषिक विद्यापीठांचे कुलगुरु आणि कुलसचिव यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
यावेळी बोलताना मंत्री सामंत म्हणाले, “१०० वे संमेलन म्हणजे मराठी साहित्याच्या परंपरेचा केवळ एका शतकाचा प्रवास नाही, तर महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचा, भाषेचा आणि वैचारिक वारशाचा सुवर्णमहोत्सव आहे. हे संमेलन केवळ स्वर्णिम भूतकाळाचा गौरव करणारे न ठरता, मराठी भाषेच्या उज्ज्वल भविष्याची दिशा ठरवणारे असावे.”
*युवा पिढीसाठी काय?*
– प्रत्येक विद्यापीठात वक्तृत्व, निबंध, काव्यवाचन, कथालेखन स्पर्धा
– डिजिटल साहित्यनिर्मिती – पॉडकास्ट, ब्लॉगिंग स्पर्धा
– तरुण लेखकांचे कट्टा-संवाद
– सोशल मीडिया आणि वार्तांकनात मीडिया विद्यार्थ्यांचा सहभाग
या बैठकीस ऑनलाईन प्रणालीद्वारे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, SPPU कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, पुस्तक महोत्सव संयोजक राजेश पांडे, मराठी साहित्य परिषद अध्यक्ष योगेश सोमण आदी उपस्थित होते.
#100thMarathiSahityaSammelan #SPPU #UdaySamant #MAIMedia24
—






















