**महसूल मंत्री बावनकुळेंचे स्पष्ट SOP तयार करण्याचे आदेश; स्वयंपुनर्विकासातील अडथळे दूर होणार*
*बातमी:*
*मुंबई, दि. २० ऑगस्ट (Maimedia24):* राज्य शासनाने रद्द केलेल्या अकृषिक कराची (Non-Agricultural Tax) सहकारी गृहनिर्माण संस्थांकडून चुकीच्या पद्धतीने सुरू असलेली वसुली तात्काळ थांबवून, वसूल केलेला कर परत करण्याची व्यवस्था निर्माण करावी, अशी आग्रही मागणी स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आ. प्रवीण दरेकर यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे.
बुधवारी मंत्रालयात महसूल मंत्र्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत आ. दरेकर यांनी हा मुद्दा उपस्थित केला. या बैठकीला आ. संजय केळकर व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते. महसूल मंत्री बावनकुळे यांनीही याबाबत स्पष्ट कार्यपद्धती (SOP) निश्चित करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.
*आ. दरेकर यांच्या ४ प्रमुख मागण्या:*
*१. अकृषिक कर परतावा:* रद्द केलेला कर अजूनही वसूल केला जातोय, तो थांबवा आणि घेतलेला पैसा परत द्या.
*२. कन्व्हेयन्ससाठी ऑनलाईन प्रक्रिया:* नोंदणी अधिकाऱ्यांनी कन्व्हेयन्स डीड नोंदवल्यावर ती थेट ऑनलाईन महसूल कार्यालयाला पाठवावी. महसूल कार्यालयाने ७/१२ आणि मालमत्ता पत्रकावर सोसायटीचे नाव लावून ते ऑनलाईन द्यावे. त्यासाठी वेगळी सुनावणी नको.
*३. फेरफारसाठी हेलपाटे नको:* प्रत्येक तहसीलमध्ये वेगळी पद्धत आहे. त्यासाठी एकच SOP करा आणि ऑनलाईन फेरफार सुरू करा. विनाकारण कागदपत्रे मागू नका.
*४. ULC सदनिकांसाठी एकच GR:* ULC आरक्षित सदनिकांबाबत अनेक GR आहेत. त्यामुळे पुनर्विकास अडतो. एकच GR काढा आणि नोडल अधिकारी नेमा.
यावेळी दरेकर म्हणाले की, “डिम्ड कन्व्हेयन्सचा आदेश निघाल्यावर पुन्हा सुनावणीची गरज नाही, हे शासनाने स्पष्ट करावे. जे अधिकारी ऐकणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि मालमत्ता पत्रकावर नाव लावण्याची कालमर्यादा निश्चित करावी.”
—
*थंबनेल:*
*”सोसायट्यांकडून अकृषिक कर वसुली थांबवा! – दरेकरांची मागणी”*
*
#PravinDarekar #Bawankule #SocietyRedevelopment #NonAgriculturalTax #Maimedia24





















