Home Uncategorized * *युनविमेनचा स्वतंत्र अजेंडा कमकुवत होऊ नये; महिला चळवळीचा आवाज अधिक प्रभावी...

* *युनविमेनचा स्वतंत्र अजेंडा कमकुवत होऊ नये; महिला चळवळीचा आवाज अधिक प्रभावी करण्याची गरज – डॉ. नीलम गोऱ्हे*

84
0

* *युनविमेनचा स्वतंत्र अजेंडा कमकुवत होऊ नये; महिला चळवळीचा आवाज अधिक प्रभावी करण्याची गरज – डॉ. नीलम गोऱ्हे*

*UN Women-UNFPA प्रस्तावित विलीनीकरणात महिला संघटना व नागरी समाजाशी संवाद आवश्यक – दिल्लीत AIWC बैठकीत भूमिका*

*बातमी:*

नवी दिल्ली, दि. २० ऑगस्ट २०२६:
*UN80 Reform अंतर्गत UN Women आणि UNFPA च्या प्रस्तावित विलीनीकरणाबाबत निर्णय घेताना महिला हक्क, लैंगिक समानता आणि महिला सक्षमीकरणाचा स्वतंत्र अजेंडा कमकुवत होता कामा नये, अशी स्पष्ट भूमिका डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मांडली.*

प्रा. पाम राजपूत यांच्या पुढाकाराने All India Women’s Conference (AIWC), नवी दिल्ली येथे झालेल्या विशेष बैठकीत त्या बोलत होत्या.

*डॉ. गोऱ्हे यांचे ४ महत्त्वाचे मुद्दे:*

*१. विलीनीकरणाचे परिणाम तपासा:* केवळ समर्थन/विरोध नको, तर याचा दीर्घकालीन परिणाम काय होईल, आर्थिक पाठबळ कायम राहील का, याची स्पष्टता हवी.

*२. नागरी समाजाला विश्वासात घ्या:* ज्या निर्णयाचा जगभरातील महिलांवर परिणाम होणार आहे, तिथे प्रत्यक्ष काम करणाऱ्या महिला संघटना, कार्यकर्त्यांचा आवाज गेला पाहिजे.

*३. डिजिटलवर जागतिक नेटवर्क:* X, Instagram वर महिला हक्कांसाठी जागतिक नेटवर्क उभं करून दूतावास, युवा कार्यकर्त्यांना जोडून सकारात्मक जनमत तयार करा.

*४. अजेंडा महत्त्वाचा, संस्थेचं नाव नाही:* प्रजनन हक्क, हिंसाचार, मानव तस्करी, दलित-वंचित महिलांचे प्रश्न हे केंद्रस्थानी राहिलेच पाहिजेत.

या बैठकीला सुनिला, ज्युडिथ अ‍ॅन, नमिता भंडारे, बीना पल्लिकल, मिताली राजकुमार यांच्यासह २० हून अधिक महिला हक्क प्रतिनिधी उपस्थित होत्या.

> “गेल्या ३०वर्षांत महिला चळवळीने जे धडे शिकले, ते नव्या पिढीपर्यंत पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे.” – डॉ. नीलम गोऱ्हे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here