Home नाटक / चित्रपट / मालिका / समीक्षा *माणसाची किंमत* – – रा.ग.सोनुने गुरुजी, बुलढाणा

*माणसाची किंमत* – – रा.ग.सोनुने गुरुजी, बुलढाणा

80
0

*माणसाची किंमत*
– – रा.ग.सोनुने गुरुजी, बुलढाणा

माणसाची किंमत तरी काय असेल आजच्या जगात?वेगवेगळ्या देशात वस्तूंची व माणसांची किंमत वेगवेगळी असते.माणूस इथून तिथून सारखाच असतो पण पदामुळे व पैशामुळे त्याची किंमत वेगवेगळी ठरवली जाते आजच्या जगात.जशी माणसाची तशीच या जगात वेगवेगळ्या देशांची किंमत कमी-जास्त!जो देश भौतिक,नैसर्गिक समृध्दीने समृध्द त्या देशाची किंमत व त्या देशातील माणसाची किंमत जास्त.देशादेशात जगण्याची किंमती वेगळी व मृत्युची किंमतही वेगळी.बलाढ्य देशातील एखादा माणूस मृत्यु पावला तर जगात त्याच्या बातम्या.कमजोर देशातील माणूस मेला तर त्याची दखलही घेतली जात नाही.बलाढ्य देश त्यांच्या देशातील माणसाचा जन्म व मृत्यू चढ्या भावात विकतो व त्याला खरीददार खूप सापडतात.कमजोर देशाच्या वस्तू तर सोडाच पण कमजोर देशातील माणसाला भाव मिळत नाही.असे असले तरी या जगात माणसाच्या झोपेची किंमत,श्वासाची किंमत,धडकत असलेल्या हृदयाची किंमत तर सारखीच आहे.अनुभवाची किंमत सारखीच आहे.वेदनेची किंमत सारखीच आहे.
यु.एस.ए.पेक्षा अफगाणिस्तान फार कमी शक्तीशाली आहे,तरी तोरा-बोराच्या डोंगरात राहत असलेल्या एखाद्या मुलाचं आयुष्य अमेरिकेतल्या बेव्हरली हील्समधल्या मुलाच्या आयुष्याइतकंच मोलाचं आहे असं मानलं जातं.आणि हे मानायलाच हव.कारण मनुष्यता सर्वत्र सारखीच आहे.माणूस हा मनुष्यतेचा सेतू आहे.याविषयी अलेक्सांद्रा वॅसिलिऊ ही रोमानियन कवयित्री म्हणते:
Of all the things
I can do
On this earth.
I just want to build
A bridge
From my heart to yours.
परंतू…..
माणूस त्याच्या दुष्ट बुध्दीने माणसामाणसाच्या किंमतीत व वस्तूंच्या किंमतीत भेद करतो,हे दुर्दैवच म्हणावं लागेल.

 

🌱
✒️लेखक
रा.ग.सोनुने
शिक्षक
मानसशास्त्र – तत्त्वज्ञान अभ्यासक , बुलढाणा

🙏😊

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here