Home जालना / परभणी / बीड / लातूर / हिंगोली / नांदेड / उस्मानाबाद *उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बीडच्या क्रीडा संकुलाला ‘सरप्राईज व्हिजीट!’*

*उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बीडच्या क्रीडा संकुलाला ‘सरप्राईज व्हिजीट!’*

29
0

*उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बीडच्या क्रीडा संकुलाला ‘सरप्राईज व्हिजीट!’*

*आवश्यक सुविधा देऊन बीडच्या क्रीडा क्षेत्राला नवी दिशा द्या – सुनेत्रा पवार*

 

बीड, दि. १४ ऑगस्ट – बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज बीड जिल्हा क्रीडा संकुलाला अचानक भेट देऊन तेथील विविध विकासकामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी क्रीडा संकुलात सराव करणाऱ्या खेळाडू, विद्यार्थी आणि युवकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी व अपेक्षा जाणून घेतल्या.

क्रीडा संकुलात सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून कामांची सद्यस्थिती आणि उपलब्ध सुविधांची माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली. क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी युवकांचा सहभाग आणि नव्या खेळाडूंना प्रोत्साहन देणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे सुनेत्रा पवार यांनी यावेळी सांगितले.

बीड जिल्ह्यातील नवोदित खेळाडूंना त्यांच्या क्रीडा कौशल्याला वाव मिळावा, यासाठी आवश्यक त्या मूलभूत सुविधा, सरावासाठी योग्य वातावरण आणि आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देण्याच्या सूचना सुनेत्रा पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच क्रीडा संकुलातील कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचनाही केल्या.

यावेळी क्रीडा संकुलात उपस्थित असलेल्या मुलांशी त्यांनी आस्थेने संवाद साधला. कोणत्या खेळाचा सराव करता, कोणत्या सुविधा आवश्यक आहेत, प्रशिक्षण घेताना कोणत्या अडचणी येतात, याबाबत त्यांनी खेळाडूंकडून माहिती घेतली. बीड जिल्ह्यातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव लौकिक मिळविणारे खेळाडू घडावेत, यासाठी शासनस्तरावर आवश्यक ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही सुनेत्रा पवार यांनी दिली.

यावेळी माजी मंत्री धनंजय मुंडे, आमदार विजयसिंह पंडित, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्यासह विविध मान्यवर, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here