Home मुंबई *राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी प्रदेशाध्यक्षपदी ॲड. चिन्मय गाढे यांची नियुक्ती…*

*राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी प्रदेशाध्यक्षपदी ॲड. चिन्मय गाढे यांची नियुक्ती…*

10
0

मुंबई दि. ५ ऑगस्ट – राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष पदी ॲड. चिन्मय गाढे यांची नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मान्यतेने प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने महिला प्रदेशाध्यक्षा पदी वैशाली नागवडे आणि युवक प्रदेशाध्यक्ष पदी निखिल ठाकरे यांची नियुक्ती सकाळी करण्यात आली तर दुपारी विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष पदी ॲड. चिन्मय गाढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

चिन्मय गाढे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सन २००९ पासून काम करत आहेत. नाशिक विद्यार्थी शहराध्यक्ष, युवक शहर कार्याध्यक्ष, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अशी पदे भूषविली आहेत आणि आता विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मान्यतेने प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here