Home Uncategorized पुरातत्व विभागाअंतर्गत असलेल्या दुर्ग ,किल्ल्यांवरील स्वच्छता आणि तेथील देवळातील नित्यपुजा देखभालीबाबत...

पुरातत्व विभागाअंतर्गत असलेल्या दुर्ग ,किल्ल्यांवरील स्वच्छता आणि तेथील देवळातील नित्यपुजा देखभालीबाबत डॉ नीलम गोऱ्हे यांच्या सूचना

139
0

 इतिहास तज्ञांनी व दुर्गप्रेमींनी याबाबतची माहिती asmita.jagruti@gmail.com,  dychairman.mls@gmail.com
या अधिकृत मेल वर देण्याचे आवाहन  उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून करण्यात आले.

५ जुलै :विधानपरिषद सभागृहात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नियम ९३ अन्वये, दौलताबाद शहरातील किल्याच्या आतील भारत माता मंदिरातील स्वच्छ्ता आणि देखभाल बाबतची सूचना सभागृहात मांडली. महाराष्ट्रातील दुर्गकिल्ले हे केंद्र आणि राज्य पुरातत्व विभागाच्या दोधांच्याही अंतर्गत आहेत. त्यामध्ये अनेक दुर्गकिल्ल्यावर प्राचीन काळातील अनेक मंदिरे आहेत.त्याचा संदर्भ घेऊन राज्य पुरातत्व विभागाकडील दुर्गकिल्यावरील मंदिरातील सकाळी व सायंकळी पूजा तसेच स्वच्छता व्यवस्थित करण्याची सूचना केली होती. त्यावर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वरील सूचना लक्षात घेऊन महाराष्ट्रातील ज्या ज्या दुर्गकिल्यावर मंदिरे आहेत त्या त्या ठिकाणी स्वच्छ्ता आणि देखभाल सुरू करणार असल्याचे आश्वासन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात दिले.व सुमारे ३५० किल्ल्यांची यादीही दिली .

यावेळी इतिहास तज्ञांनी व दुर्गप्रेमींनी याबाबतची माहिती asmita.jagruti@gmail.com,  dychairman.mls@gmail.com
या अधिकृत मेल वर देण्याचे आवाहन  उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून करण्यात आले.

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here