*मतदारसंघातील समस्या निधीअभावी* *रखडल्याकडे सभागृहाचे वेधले लक्ष*
मुंबई – निधीअभावी दिंडोशी मतदारसंघातील समस्या रखडल्याकडे सभागृहाचे लक्ष वेधत आमदार सुनील प्रभू हे दिंडोशी विधानसभेतील समस्यांबाबत आज विधानसभा सभागृहात आक्रमक झाल्याचे दिसून आले.
मालाड पूर्वेकडील काही भागात असलेल्या उंच उंच दरडी या पावसाळ्यात कोसळतात.
दरडी कोसळण्यावर शासनाने २०२२- २३ या वित्तीय वर्षांत ६१५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. मालाड भागात असलेल्या दरडींभोवती संरक्षक भिंत बांधण्यासाठीची मागणी वेळोवेळी सभागृहात करूनही निधी अभावी ते काम रखडल्याचे आमदार सुनील प्रभू यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
दिंडोशी येथील रत्नागिरी हॉटेल ते लोखंडवाला पर्यंतच्या १२० फूट रस्त्याची निविदा प्रक्रिया पार पडली आहे. ही निविदा वनविभागातून होते, त्याच कंत्राटदाराने हे काम करायचं आहे. त्यासाठी तेथील झोपड्या काढून जागा मोकळी करण्यात आली. तरी पालिकेकडून अद्याप तरतूद करण्यात आली नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून या रस्त्याचे काम रखडले आहे. या कामासाठी सरकारने विशेष अधिकारी नेमून हे काम पूर्ण करावे, अशी मागणी आमदार सुनील प्रभू यांनी सभागृहात केली.
जी जी महाविद्यालय ते संस्कार महाविद्यालयपर्यंतचा महत्वाचा डीपी रस्त्याचं कामही गेले कित्येक वर्षे प्रलंबित आहे. या रस्त्याच्या मध्ये जी घरे येतात त्यांचे पुर्नवसन दिंडोशी परिसरात सुरू बांधकाम सुरू असलेल्या एसआरएच्या इमारतींमध्ये करावं, जेणेकरून रस्ता मोकळा होईल.मात्र याची फाईल गेल्या ६ महिन्यांपासून सचिव वलसा नायर यांच्याकडे प्रलंबित आहे.
२२५ फुटाच्या पिटीसी ३०० फूट करण्याबाबत सरकारने निर्णय घ्यावा, अशी मागणी आज सभागृहात आमदार सुनील प्रभू यांनी केली.