Home संमेलन / अधिवेशन / सण / उत्सव *उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतले श्री विठ्ठल – रुक्मिणी मातेचे दर्शन*

*उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतले श्री विठ्ठल – रुक्मिणी मातेचे दर्शन*

36
0

पंढरपूर, दि-०४ :- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.

यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला

यावेळी आमदार दिलीप वळसे पाटील, नगराध्यक्षा प्रणिती भालके,मंदिर समितीचे सदस्य शकुंतला नडगिरे, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, संभाजी शिंदे, जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन, जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, प्रांताधिकारी सचिन इथापे,मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत ढगळे, मुख्याधिकारी महेश रोकडे, व्यवस्थापक प्रवीणकुमार घम तसेच मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

तत्पूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन विकास आराखड्या अंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी करुन माहिती घेतली. यावेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मंदिर जतन व संवर्धन विकास आराखड्याअंतर्गत करण्यात आलेल्या व करण्यात येणाऱ्या कामांची माहिती दिली.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर जतन व संवर्धन विकास आराखड्यांतर्गत जीर्णोद्धार पूर्ण झालेल्या मंदिरांतील मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी होम हवन करण्यात आले होते या होम हवनचे दर्शन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावेळी घेतले.
०००००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here