Home मुंबई *सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी किडनी विकली प्रकरणातील मुख्य सूत्रधार दिवाकर निपुरेला अटक कधी...

*सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी किडनी विकली प्रकरणातील मुख्य सूत्रधार दिवाकर निपुरेला अटक कधी करणार? सरकार त्याचे संरक्षण का करत आहे काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल*

40
0

*याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे मंत्र्यांचे आश्वासन*

मुंबई, दि. २९ : सावकारी कर्ज रोशन कुळे प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून नाव समोर आलेल्या दिवाकर निकुरे याला अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याबद्दल काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.

प्रश्नोत्तरे काळात विधानसभेत बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, दिवाकर निकुरे या सावकाराने शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावून सुमारे १३० चेक दिले, मात्र ते सर्व चेक बाऊन्स झाले. एवढ्या मोठ्या प्रमाणात फसवणूक करूनही तो अद्याप फरार असून त्याच्यावर कारवाई का होत नाही, याचे उत्तर सरकारने द्यावे.

रोशन कुळे प्रकरणात इतर आरोपींना अटक करण्यात आली असताना मुख्य सूत्रधार मात्र अजूनही मोकाट आहे. दिवाकर निकुरेच्या खात्यात आठ लाख रुपयांचा व्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे. तरीदेखील त्याला अटक होत नसल्याने त्याला नेमके कोणाचे संरक्षण मिळत आहे, असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

ते पुढे म्हणाले की, दुसऱ्या पक्षातून सत्ताधारी पक्षात प्रवेश केल्यानंतर संबंधित व्यक्तीवर कारवाई होत नसल्याचा संशय जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. १३० चेक बाऊन्स करून फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला तात्काळ अटक करून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

यावर उत्तर देताना संबंधित मंत्र्यांनी रोशन कुळे प्रकरणातील संबंधित व्यक्तीबाबत चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन सभागृहात दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here