महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास आज पासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीतील सर्व आमदारांनी विधान भवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले.
[22/06, 11:54] Pro Vijay Wadettivar Rashmi Puranik: नको अटी नको शर्ती…
शेतकऱ्यांना हवी कर्जमुक्ती !
महायुतीने सत्तेत येताना शेतकऱ्यांना सातबारा कोरा करण्याचे वचन दिले होते. प्रत्यक्षात सत्तेत आल्यानंतर मात्र भरमसाठ अटी व शर्ती लादून शेतकऱ्यांना फसवी कर्जमाफी देण्यात आली आहे. आज विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर या फसव्या कर्जमाफीच्या विरोधात विरोधी पक्षांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. सत्ताधाऱ्यांनी दिलेले वचन पूर्ण करावे, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी आक्रमक मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली.



















