*भुशी धरण धबधबा दुर्घटनेमध्ये एस.ओ.पी अंमलबजावणी न करणाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्याबाबत उपसभापती, विधानपरिषद, डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आपत्ती व्यवस्थापन विभागाला निर्देश.*
दि१ जुलै: लोणावळा येथील भुशी धरणाच्या मागील बाजूला असलेल्या धबधब्याच्या प्रवाहाने एकाच कुटुंबातील ४मुले व १ महिला असे ५जण वाहून गेले. त्यापैकी ३ जणांचे मृतदेह सापडले आहेत.
हडपसर पुण्याच्या अन्सारी कुटुंबावर कोसळलेल्या या दुर्देवी आपत्तीची दखल उपसभापती, विधानपरिषद, डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली असून याबाबत एस.ओ.पी. नुसार कर्तव्य न बजावणाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात यावी, आपद्ग्रस्त कुटुंबास मदत पुरविण्यात यावी व समुपदेशन करण्यात यावे असे निर्देश डॉ. गोऱ्हे यांनी मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री यांना निवेदन दिले आहे.
तसेच राज्यात आपत्ती व्यवस्थापनाची काटेकोरपणाने अंमलबजावणी करण्यात यावी. असेही कळविले आहे.



















