धी यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे अभिनव विद्यामंदिर बोरिवली (पूर्व) येथील २०५ विद्यार्थी विद्यार्थिनींना पाठ्यपुस्तके आणि शालोपयोगी साहित्याचे वाटप
धी यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे पाठ्यपुस्तक योजना गेली पाच वर्षे राबवली जात आहे यावर्षी अभिनव विद्यामंदिर बोरिवली (पूर्व) येथील २०५ विद्यार्थी विद्यार्थिनींना पाठ्यपुस्तके आणि शालोपयोगी साहित्याचे वाटप एका दिमाखदार समारंभात करण्यात आले. यावेळी ट्रस्टतर्फे सुरेश डोंगरे (विश्वस्त) आणि हेमंत जोशी (मुख्य कार्यकारी अधिकारी) उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ मुंबई मलबार हिलचे पल्लवी, निकिता, नयना, दीप्ती, लोमेश, सोहराब दावर ट्रस्ट लॉज नंबर ११३,लॉज फुलचंद पटेल नंबर १६३ चे सुभाष सराफ , आनंद गोखले आणि विनय जोग, पुनीत ट्रस्ट यांचे मिलन पारेख अणि त्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन अभिनव विद्या मंदिराचे अमीन ठाकूर यांनी केले. मुख्याध्यापिका पूजा देसाई आणि मुख्याध्यापक नाईक सर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यास हातभार लावला.















