*श्रीगणेशाय नमः, ज्ञानेश्वर माऊलींना सादर वंदन!*
*कुंभाची माळ : रान पेटलंय, मालक झोपलाय!*
*रान पेटतंय…*
*वाघ बिबट्या लांडगा आणि ट्रॅपमधे काटेदार साळींदर.*
*सगळं विस्कटलं जातंय… का?*
*कारण जगण्यासाठी विश्वासाची, रक्ताची, जोडलेली नाती विरोधात जाताहेत.अशात घरभेदी लोक साळींदर बनतात.*
*मग त्याचा खरा चेहरा लोकांसमोर आणावा लागतो. आणि तो येतोच!* आजूबाजूला पहा. निरखून.वादंग, द्वेष, असुया, शह-काटशह.
*जे आपण राजकीय पटावर, सिनेमात पहात होतो, ते आता रस्त्यावर, घरात, चॅनलवर उघडं नाचतंय. चॅनलवर दिसतंय हे खरं मानण्याचे दिवस गेले.
*लोकांचे विचार आल्यामुळे बदलताहेत असं मीडियाने का मानावं?*
*कारण बातमीतला मूळ नीतीमत्ता आणि सत्याचा पायाच गायब झालाय.क्रॉसचेक करायला यांच्याकडे वेळच नाही न?*
●*रानाचं जंगल जळतंय.वृक्षवल्ली करपली. पशु-पक्षी बेघर झालेआसरा गेला, जगायचं कसं? म्हणून ते शहरात येतात.*
*आणि मग सुरु होते, माणूस विरुद्ध जंगली सजीव लढाई.*
*कुठे न्याय मागणार ही देवाची लेकरं? देवाचंच जंगल स्वाहा होतंय.* ●धर्माच्या नावाने माणसं तोडली जाताहेत.*
*इतकं विद्वेषाचं विखारीपण आजवर पाहिलं नव्हतं.*
*गरीबाचं रान वाचवलं पाहिजे, पण इथे देवाचंच रान लुटलं जातंय.आपल्याच मुळावर घाव घालणारे शेखचिल्ली वाढलेत.* ●मग कसा जगेल माणूस? हवा विषारी. पाणी गढूळ. नोकरी नाही.आणि नेते रोज लढाईच्या नशेत डुंबताहेत. काय उपयोग अशा विकासाचा?बुलेट ट्रेन येणार, पण गावात एसटी बंद.5G टॉवर लागला, पण शेतात पाणी नाही.
*जंगल जाळून, नदी मारून, माणूस उपाशी ठेवून जो विकास येतो, त्याचा काय उपयोग?* ●कारण जंगलाचा नियम यांनी बदलला.एकटा लढणारा वाघ पिंजऱ्यात कोंडला.राज्य करायला बिबट्या आला. रंग बदलणारा सरडा.लुटायला लांडगे आले. टोळी करून देश खाणारी वृत्ती वाढली. ●आणि शेवटी उरला झाकणझुल्या साळींदर.गोड बोलून काटे टोचणारा. कवचात सुरक्षित रहात, सगळीकडे काटे फेकणारा.लपून, निष्ठेचा मुखवटा घालून, ‘मीच सर्वेसर्वा’ म्हणून मिरवणारा.आपलीच माणसं तोडणारा हा खतरनाक साळींदर इतिहासाने प्रथमच पाहिला.* ●दगाबाज नं.१ चा शिष्य.*
अशांची कधी तरी गाढवावरून धिंड काढायची वेळ येतेच, हा कधी तोंड बंद करतो.खोक्यांना ‘ओके’ही म्हणतो. चिखल उडवायला तयार. असतो.
●विरोधकांना पूर्ण चमकण्याची संधी देणारा हा ‘साळींदर हटाव’ मोहिम ठाकरेंच्या सेनेत सुरु आहे. रानाचं जंगल वाघ राखतो. राजकारणाचं रान लांडगे खातायत.*
●पण हा महाराष्ट्र असा नव्हता. हा देश असा नव्हता.*
*हा अमृतकुंभ होता. हिरे-माणकांनी भरलेला.पण मग हा कचरा कुठून आला? विचार करा! यासाठी आठवा,विघ्नहर्ता, बुद्धीदाता.रक्तबीज वाढलेत म्हणून गणपती पाहिजे.देवाचा बाजार झालाय म्हणून गजानन पाहिजे.कारण त्याने शिकवलं: “मायबाप हेच खरे देव. हाच खरं स्वर्ग.” ●ज्ञानेश्वर माऊली आठवा.*
*वयाच्या १६व्या वर्षी भिंत चालवली, रेड्याकडून वेद वदवले.*
*का? चमत्कारासाठी नाही. नजर देण्यासाठी.*
*म्हणाले: “या भिंतीत पण तोच आहे. या रेड्यात पण तोच आहे. चराचरात तोच आहे.”गीता संस्कृतात बंद होती. माऊलीने तिला मोकळं केलं. प्राकृतात आणलं.*
*”माझा मराठाचि बोलु कौतुके, परी अमृतातेंही पैजा जिंके.”चा गजर केला. ●अशी हिरे-माणके-मोती आपल्या इतिहासात आहेत.*
*आपल्याकडे सुवर्णअमृत कुंभांची माळ आहे. ती जपणं, जगणं आज गरजेचं. ●कालिदासाचा मणी* : निसर्गात देव आहे. त्याला तोडू नका.
● पुण्यश्लोक अहिल्याबाईंचा मणी* : स्त्रीने वाट पाहू नये. स्वतःचा न्याय स्वतः मिळवावा.
●छत्रपती ताराराणीचा मणी* : निडरपणे स्वराज्यासाठी लढावं. मागे हटायचं नाही.
●*गाडगे बाबांचा मणी* : गाव स्वच्छ करा. मन स्वच्छ करा. खरा देव माणसात आहे.
●संत तुकारामांचा मणी* : विठ्ठल सगळीकडे आहे. नाठाळांच्या माथी काठी मारा. जातीपाती मानू नका.
●संत एकनाथांचा मणी* : अस्पृश्य कोणी नाही. सगळी विठ्ठलाची लेकरं.
● संत मुक्ताबाईंचा मणी* : वेद परमेश्वराने केले, मग आम्ही का वाचू नये?
●*संतसखूचा मणी* : काम करताना मनात देवाचं नाव. राबता-राबता देव अनुभवला.
● संंत कान्होपात्रेचा मणी* : देवाला हाक मारा. तो धावत येतोच. कुणबीण असो वा राणी.
●तुकारामाच्या आवलीचा मणी* : नवरा हाच देव. संसार हाच परमार्थ. दुसऱ्याला जगवलं की तिथेच वैकुंठ.
●संत दामाजीचा मणी* : दुष्काळात कोठार उघडावं. उपाशी माणसाला जेवू घालावं. देव भक्तासोबत असतोच. ●अशी अजून बरीच अनमोल रत्न आहेत. ती आपणही यात जोडा.चांगुलपणा जोडला की माणसं जोडता येतील.*
*आपल्यातले दगाबाज ओळखून वेळीच माथी काठी हाणता येईल.*
-●हे अकरा मणी. एका सुंदर सूत्रात गुंफलेत “देव कणाकणात आहे. तो ओळखा आणि तो जपा.”* ●पण आज हाव वाढलीय. सत्तेची. पैशाची. द्वेषाची..रक्तबीज वाढताहेत. वाद घालणारे. भांडण लावणारे. समाज तोडणारे.*
*एकाच्या जागी रक्तातून हजार जन्मणारे. हे कालीच संपवू शकते.* ●जनतेचा आक्रोश हवेत विरतो. देवाचाही बाजार होतोय.*
*पण लक्षात ठेवा: जनता मालक आहे. पण मालक झोपलाय. म्हणून लांडगे माजलेत.मीडियाचं लक्ष्य अचूक हवं. पण तेवढा दम नाही आजच्या मीडियात.*
*मीडिया “कोण फुटणार, कोण जाणार” चा शंख रोज फुंकतोय. पण खरा मणी दाखवत नाही.* लांडगा आला रे आला कसरत सुरु आहे, साळींदर आणि त्याच्या बाॅसची ●वासुदेवाने सांगितलंय: सगळीकडे युध्द नको.*
*वणवा युध्दाने, पांचजन्य नादाने वाढतो. विझतो तो बासुरीच्या सुरानेच.* ●*मग आता काय? निराश व्हायचं? नाही!*
*तो म्हणाला होता: अधर्म मातला तर नाशासाठी आणि सद् रक्षणासाठी जन्म घेतोच.*
●पण आज श्रीकृष्ण चमत्काराने येणार नाही. तो आपल्यात आहे.करंगळीने पर्वत उचलणारा तो सोबत आहे.*गोवर्धन उचलायला आला होता. आज हे विस्कटलेलं सावरायलाही तो आपल्यातच आहे.*
*ती बासुरी आपल्या हृदयात आहे. आपण वाजवायची आहे.*
*तो विवेक आपल्यात आहे. कधी युध्दासाठी पांचजन्य फुंकायचा ते आपण ठरवायचं.*
●सखू दळता-दळता अभंग गायली. कान्होपात्रेने नाचता-नाचता पद रचली.*
*सुवर्ण कुंभ उचलायला दोन हात लागतात. एक सांगणारा, एक लिहिणारा. कृती करणारा.* उठा. जागे व्हा. बासुरी उचला. मणी गोळा करा. विचारांचे म्हणजे भरकटण थांबेल.
●वाघाला पिंजऱ्यातून बाहेर काढायचं. लांडग्यांना हाकलायचं. साळींदराचं झाकण कायमचं उघडायचं. माऊलीसारखं लिहा. भिंतीला पण काळीज आहे, रेड्याला पण वेद कळतात, हे सांगायची वेळ आलीय.*
*गणपतीसारखं लिहा. पहिली पूजा मातीची. पहिली प्रदक्षिणा मुक्या जीवांची.* कारण माऊली म्हणालेली: “आपल्यातला देव थोडा अंश जरी ओळखता आला तर चांगभलं होणार आहे आयुष्याचं.”*
*झाड तोडताना हात थरथरला पाहिजे. नदीत कचरा टाकताना लाज वाटली पाहिजे.*
*एवढा अंश कळला तरी पुरे. मग विनाश थांबतोच.*
●हीच माळ आज गुंफलीय. अकरा मणी आणि शत्रू एकच: रक्तबीज.!
*उपाय एकच: कालीमाता व्हा. रक्त जमिनीवर पडू देऊ नका.*
*राक्षस नि वाद वाढू देऊ नका. सत्य बोला. सत्य लिहा.रान पेटतंय. पण विझवणाराही आपल्यातच आहे.* ●शेवटी प्रश्न एकच : कसा जगेल माणूस?*
*उत्तर तू आहेस. तुझ्यातला कृष्ण. तुझ्यातली काली.*
*बासुरी उचल, किंवा पांचजन्य फुंक.पण मालका, आता तरी जागा हो.* ●*वर्तमानाचं उदाहरण?*●
*विधान परिषदेचा गुलाल उडतोय. पण दुसरीकडे कुणीतरी कुणाला संपवू पहातंय.असा कल्ला सुरु केलाय.
● इथेच साळींदर काटे मारतंय!*
*शिवसेना उबाठाचे खासदार फुटणार, मंत्रीमंडळात स्थान मिळणार. अशा नरेटिव्ह सेट करणाऱ्या बातम्या कोणत्या सूत्रांच्या आहेत?*
*आज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असते तर अशी हिंमत झाली असती का?*साळिंदराचे काटेच कापले गेले असते.* पण एक आहे: अधर्माचा नाश अचूक वेळेत होतोच. कारण तो हिशोब करतोच.*
*पण मीडिया अचूक बातम्या का देत नाही, हे त्यांनाच ठाऊक!इथे रान पेटलंय. ते विझवायला आपल्यातला तो सक्षम आहे.*
*नाही. ते विझवायला तुम्ही सक्षम आहात.*
चांगभलं🚩


















