Home नाटक / चित्रपट / मालिका / समीक्षा *नात्याची ट्विस्टेड गोष्ट ​सांगणारा “कप बशी”* *”कप बशी” चित्रपटाचा रंजक ट्रेलर...

*नात्याची ट्विस्टेड गोष्ट ​सांगणारा “कप बशी”* *”कप बशी” चित्रपटाचा रंजक ट्रेलर लाँच*

6
0

*’कप बशी’ चित्रपट १९ जूनला*

गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या विशिष्ट अटीमुळे चर्चेत असलेल्या “कप बशी” चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर लाँच झाला आहे. आई, मुलगा आणि होणारी सून यांच्या एव्हरग्रीन नात्याची ट्विस्टेड गोष्ट “कप बशी” या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. येत्या १९ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अभिनेता ऋषी मनोहर आणि अभिनेत्री पूजा सावंत ही नवी जोडी हे चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे.

सुकल्प चित्र या निर्मिती संस्थेने “कप बशी” या चित्रपटाची निर्मिती केली असून कल्पक सदानंद जोशी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर बिग ब्रेन प्रॉडक्शन्सच्या निलेश रामगोपाल राठी यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. चित्रपटाची पटकथा ​​​, संवाद चेतन सैंदाणे यांनी लिहिले असून दिग्दर्शन वैभव रामकृष्ण चिंचाळकर यांचे आहे.”कप बशी” चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीला पहिल्यांदाच सुप्रसिद्ध ज्येष्ठ संगीतकार उत्तम सिंग यांचे सुमधुर संगीत लाभले आहे. गुरु ठाकूर यांनी गीतलेखन, बाळू दहिफळे यांनी कॅमेरामन तर संकलक म्हणून आशिष म्हात्रे यांनी काम पाहिले आहे . राष्ट्रीय पुरस्कार विजेते मंदार कमलापूरकर यांनी ध्वनी संयोजक तर राष्ट्रीय पुरस्कार विजेते श्रीकांत देसाई यांनी लूक डिझायनर म्हणून काम पाहिले आहे. नृत्य दिग्दर्शन दीपाली विचारे, कला दिग्दर्शन महेश कुडाळकर तर प्रोजेक्ट हेड म्हणून चिन्मय शिंत्रे यांनी काम पाहिले आहे.चित्रपटात अभिनेत्री निर्मिती सावंत, पूजा सावंत, नवोदित चेहरा ऋषी मनोहर, नयना आपटे, अनंत जोग, राहुल रानडे, आनंद इंगळे, आनंद काळे, चिन्मय शिंत्रे ,उमा सरदेशमुख यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

लग्न जमण्यामध्ये पत्रिका जुळणं महत्वाचं मानलं जात.
पण आताच्या आधुनिक काळात उच्च शिक्षित मुलगी जी
स्वतः रेडिओ जॉकी असून होणाऱ्या नवऱ्याऐवजी त्याच्या आईशी पत्रिका जुळण्याची अट घालते. या चमत्कारिक अटीमुळे काय काय धमाल किस्से घडतात, याची मनोरंजक आणि तितकीच भावनिक गोष्ट “कप बशी” या चित्रपटात पहायला मिळणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर कथानकाची उत्सुकता वाढवणारा आहे. चित्रपटाचं नाव, टीजर, स्टारकास्ट लक्षवेधी आहे, तसेच ट्रेलरमुळे चित्रपटाच वेगळेपण नक्कीच जाणवत आहे. अनोख्या कल्पनेला उत्तम अभिनय, खुसखुशीत संवादांची जोड असल्याचं ट्रेलरमधून पाहायला मिळतं. लग्नासाठी पत्रिका पाहण्यासारख्या परंपरेतून नात्याची ट्विस्टेड गोष्ट सांगणाऱ्या “कप बशी” या चित्रपटानं उत्कंठा निर्माण केली आहे.

*Trailer Link*

https://youtu.be/40KoEoZXEQI?si=hfMlGn3fEwnuZ0EQ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here