Home मुंबई *एन.पी.ए शून्य करण्याचे उद्दिष्ट ! बल्लाळेश्वर सहकारी पतपेढीच्या सभासदांना १०.५० % लाभांश...

*एन.पी.ए शून्य करण्याचे उद्दिष्ट ! बल्लाळेश्वर सहकारी पतपेढीच्या सभासदांना १०.५० % लाभांश जाहीर ; संस्थेला अ वर्गाचा दर्जा*

7
0

मुंबई, दि. (प्रतिनिधी) :
नवी मुंबईमधील बल्लाळेश्वर सहकारी पतपेढीच्या सभासदांना यंदाच्या आर्थिक वर्षासाठी १०.५० % लाभांश जाहीर करण्यात आला असून या संस्थेला अ वर्गाचा दर्जा प्राप्त झाला आहे. नवी मुंबईमधील बल्लाळेश्वर सहकारी पतपेढीची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच मोठ्या उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. बॉम्बे बंट्स सभागृह, जुईनगर, नवी मुंबई येथे अध्यक्ष आनंद सबाजी गावडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेत उपाध्यक्ष भगवान शेटे, संचालक सुरेश गावडे, बाबुराव डोंगरे, वसंत गावडे, दामाजी डोंगरे, शरद डोंगरे, रमेश धुमाळ, जगन्नाथ दाते, नरेंद्र तांबोळी, उमेश डोंगरे, दैवत डोंगरे, बाळासाहेब डोंगरे, प्रदीप नवले, सौ. सुनिता डोंगरे, सौ. निता गावडे, तज्ञ संचालक खंडू आहेर, हर्षल आहेर व संस्थेचे सरव्यवस्थापक संजय घोगरे उपस्थित होते. त्याचप्रमाणे स्थानिक सल्लागार, दैनंदिन ठेव प्रतिनिधी विविध शाखांमधून बहुसंख्येने मोठ्या प्रमाणात सभासद उपस्थित राहिले होते. या वार्षिक सर्वसाधारण सभेस साई प्रेरणा को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संस्थापक देवदास डोंगरे, अध्यक्ष तुकाराम मोरे, मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे प्रसिद्धीप्रमुख आणि पोर्ट ट्रस्ट कामगार दिवाळी अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव, मराठी चित्रपट सृष्टीतील सिने कलाकार राम काजरोळकर, संस्थेचे कायदेविषयक सल्लागार ॲड. सोपान डुंबरे व ॲड. अमोल कुरळे, सानपाडा विभागातील ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी, सदस्य तसेच विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर देखील उपस्थित होते. सभेचे समयोचित सूत्रसंचालन संस्थेचे सरव्यवस्थापक संजय घोगरे यांनी केले. सभेमध्ये संस्थेने आपल्या सभासदांचा व सभासदांच्या मुलांनी विविध क्षेत्रांमध्ये विशेष प्राविण्य मिळवल्याबद्दल व इतरांना प्रोत्साहन मिळण्यासाठी विशेष सत्कार करून त्यांचा यथोचित सन्मान केला. सभेस उपस्थित असलेल्या मान्यवरांनी संस्थेच्या पारदर्शक कामकाजाबाबत भरभरून कौतुक करून संस्थेच्या प्रगतीसाठी व पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा देखील सन्मान करण्यात आला. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आनंद गावडे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, संस्था शासनाचे सर्व निकष पूर्ण करून कामकाज करीत असते. संस्थेस सन २०२५ – २०२६ या आर्थिक वर्षामध्ये ‘अ’ वर्ग प्राप्त झाला असून सभासदांना १०.५० % लाभांश जाहीर केला. पुढील काळात संस्थेचा एन.पी.ए शून्य करणे व संस्थेच्या ज्या जागा भाडेतत्वावर आहेत त्या विभागामध्ये संस्थेच्या स्वमालकीच्या जागा खरेदी करणार असल्याचा संचालक मंडळाचा मानस आहे, असे सांगितले. आलेल्या सर्व सभासदांचे व मान्यवरांचे आभार संस्थेचे विद्यमान संचालक व जुन्नर नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक नरेंद्रभाऊ तांबोळी यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here