Home मुंबई कुर्ला (दक्षिण) परिसरातील ९० फूट मार्गावरील टिळक नगर नाला येथे असलेल्या १२००...

कुर्ला (दक्षिण) परिसरातील ९० फूट मार्गावरील टिळक नगर नाला येथे असलेल्या १२०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम आज सकाळी यशस्वीरीत्या पूर्ण

7
0

कुर्ला (दक्षिण) परिसरातील ९० फूट मार्गावरील टिळक नगर नाला येथे असलेल्या १२०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम आज सकाळी यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले.

 

रस्त्याच्या पृष्ठभागापासून सुमारे ५ मीटर खोलीवर असलेली जलवाहिनी पूर्णपणे उघडून तिच्या सुमारे १.५ मीटर लांबीच्या क्षतिग्रस्त भागाची बदली करण्यात आली. या कामामुळे जलवाहिनीची कार्यक्षमता पूर्ववत करण्यात यश आले आहे.

या कामादरम्यान एका बाजूस ३०० मिलिमीटर व्यासाची महानगर गॅस लिमिटेड (MGL) ची गॅसवाहिनी तर दुसऱ्या बाजूस पुलाची पाइल फाउंडेशन असल्यामुळे खोदकामात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. तरीही अभियंते व कर्मचारी अत्यंत दक्षतेने आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम केले आहे.

बाधित होणाऱ्या प्रभाग क्रमांक १५६, १५८, १६१, १६२, १६३, १६४, १६५, १६६, १६७, १६८ आणि १७१ च्या परिसराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येत आहे. तथापि, आजचा पाणीपुरवठा उशिराने आणि कमी दाबाने होण्याची शक्यता आहे.
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here