Home मुंबई *चित्रनगरीमध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण उपक्रम उत्साहात संपन्न*

*चित्रनगरीमध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण उपक्रम उत्साहात संपन्न*

8
0

*बी.द.चेंज संस्थेचे सहकार्य*

मुंबई, दि. ५ जून २०२६ : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बी द चेंज संस्थेच्या वतीने महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या चित्रनगरी परिसरात वृक्षारोपण उपक्रम उत्साहात पार पडला. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत हरित चित्रनगरीच्या संकल्पनेला बळकटी देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांच्या हस्ते विविध प्रकारच्या देशी वृक्षांचे रोपण करण्यात आले. पर्यावरण संरक्षण, जैवविविधतेचे संवर्धन आणि भविष्यातील पिढ्यांसाठी हिरवाई जपण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला. चित्रनगरी परिसर अधिक हिरवागार व पर्यावरणपूरक करण्यासाठी अशा उपक्रमांची सातत्याने आवश्यकता असून बी द चेंज संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेण्याचे आवाहन केले. वृक्षारोपण ही केवळ औपचारिकता नसून त्यांचे संगोपन आणि संवर्धन करणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी चित्रनगरी प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here