*’माई मीडिया 24′ ..विशेष
*बनावट कागदपत्रांच्या आधारे ४ ते ५ कोटींची शासन फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल | शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांचा जामीन अर्ज फेटाळला*
*मालेगाव , ४ जून २०२६
:* मालेगावातील महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण संस्थेतील शिक्षक भरतीत कोट्यवधींचा घोटाळा उघडकीस आला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे ४ ते ५ कोटींची शासन फसवणूक केल्याप्रकरणी १४ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून, तत्कालीन शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.
*घोटाळ्याचा संपुर्ण तपशील:*
१. *सन २०१२ मध्ये* शिक्षण विभागाने मान्यता अंतिम नाकारली होती.
२. *आरक्षण नियमांचे उल्लंघन* आणि बिंदुनामावलीची पडताळणी न करता पुन्हा मान्यता दिल्याचा आरोप.
३. *शासकीय कागदपत्रांचे बनावटिकरण करून शासनाची ४ ते ५कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप.
४. *संस्था पदाधिकारी, शिक्षण विभागातील अधिकारी, मुख्याध्यापक* एकुण १४ जणांविरुद्ध गुन्हा.
*मान्यता नाकारलेल्या ६ शिक्षकांच्या नियुक्त्या पुन्हा नियमित!*
१. संतोष मथुर खैरनार – पं.ज. नेहरू माध्यमिक विद्यालय, पाने
२. पांडुरंग विष्णू मंडळ – ता.म. जाधव विद्यालय, संभेळे
३. सुगंधा दादाजी बागुल – ता.म. जाधव विद्यालय, संभेळे
४. रोहन अरविंद अहिरे – ता.म. जाधव विद्यालय, संभेळे
५. तुषार कृष्णा बच्छाव – ता.म. जाधव विद्यालय, संभेळे
६ किशोर बापूराव – पं.ज. नेहरू माध्यमिक विद्यालय, पाने
*गुन्हा दाखल – भारतीय न्याय संहिता (BNS) 2023*
*कलम* – 318(4), 337, 338, 336(3), 340(2), 3(5), 61(2)
*ठिकाण* – छावणी पोलीस ठाणे, मालेगाव येथे गुन्हा दाखल.
*न्यायालयाची मोठी कारवाई:*
या प्रकरणातील आरोपी असलेले तत्कालीन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) नितीन मुरलीधर उपासनी यांचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालय, मालेगाव यांनी फेटाळला आहे. गुन्हा क्रमांक 336/2025 मध्ये बेल अर्ज क्रमांक 62/2026 मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश अमेठा यांनी नामंजूर केला.
तत्कालीन उपशिक्षणाधिकारी उदय विठ्ठलराव देवरे आणि विद्यमान शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांचे जामीन अर्ज देखील न्यायालयात प्रलंबित असून त्यावरील सुनावणी सुरू आहे.
*माई मीडिया 24 ची ठोस मागणी:*
शिक्षण क्षेत्रातील हा भ्रष्टाचाराचा प्रकार गंभीर आहे. _शेती हा देशातील आपल्याच मोठा उद्योग आहे_ तसेच _शिक्षण हा समाजाचा कणा आहे._ दोन्ही क्षेत्रातील घोटाळे रोखण्यासाठी प्रत्येक स्थानिक आमदाराने पुढाकार घ्यावा आणि ‘अंमलबजावणी व नियोजन समिती’ स्थापन करावी, अशी ‘माई मीडिया 24’ ची मागणी आहे.
*वाचा सविस्तर:* https://maimedia24.com/19818/
*टॅग्स:* #मालेगाव #शिक्षकभरतीघोटाळा #कोट्यवधींचाघोटाळा #नितीनउपासनी #महात्माज्योतिबाफुलेशिक्षणसंस्था #बनावटकागदपत्रे #BNS #माईमीडिया24
—
*



















