परळी (प्रतिनिधी): खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या शिवसंवाद दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर केज इथे होणाऱ्या मेळाव्याच्या तयारीसाठी शिवसेनेच्या परळी महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पाडली.
शिवसेना मुख्यानेते तथा उपमुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने मराठवाड्यासह महाराष्ट्रात संघटनात्मक बांधणीची मोठी जबाबदारी खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांच्यावर सोपवली आहे. मराठवाडा दौऱ्याच्या अंतर्गत दि.२९ रोजी होणाऱ्या बीड जिल्ह्यातील पहिली बैठक केज इथे होणार असून या बैठकीला शिवसेना महिला आघाडीची उपस्थिती जास्तीत जास्त असायला हवी या करिता शिवसेना परळी येथील महिला आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीस शेख फरजाना उपजिल्हा प्रमुख, मनोरमा डोईफोडे, शारदा डोईजड, मिरा आडे, यशोदा राठोड तालूका प्रमुख, गंगुबाई पवार उपतालुकाप्रमुख, आश्विन सातभाई तालुका उपशहर, छाया विभुते तालूका सचिव, सुप्रिया गंगाधरे उपशहर प्रमुख, पुजा पांडे उपशहर, गया रमेश राठोड शाखा प्रमुख सुमन दहातोंडे आदी महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.





















