Home मुंबई *”‘ए-८१४’ श्री सिद्धिविनायक फेरी” बससेवा २३ मे पासून भक्तांसाठी सुरु*

*”‘ए-८१४’ श्री सिद्धिविनायक फेरी” बससेवा २३ मे पासून भक्तांसाठी सुरु*

56
0

श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी श्रींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांच्याकडे विशेष बससेवेची मागणी केली होती त्यांच्या या मागणीची दखल घेत आता ‘ए-८१४ श्री सिद्धिविनायक फेरी’बससेवा दि. २३ मे २०२६ पासून सुरू करण्यात येत आहे.

दादर स्थानक(प) रवींद्र नाट्यमंदिर – श्री सिद्धिविनायक मंदिर या मार्गावर सुरु होणारी ही बससेवा हजारो भाविकांसाठी मोठा दिलासा ठरणार असून प्रवास अधिक सुलभ,जलद आणि सोयीस्कर होणार आहे.

या प्रसंगी श्री सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष मा सदा सरवणकर, बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांच्यासह न्यासाच्या विश्वस्त व महिला आघाडीच्या मीनाताई कांबळी व बेस्ट समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here