१२ मे रोजी ‘फिरुनी नवी जन्मेन मी’ आणि ‘आशा-आर डी बर्मन-दो लफ़्ज़ों की कहानी..’ या विशेष संगीतमय कार्यक्रमांचे आयोजन
मुंबई : भारतीय संगीतसृष्टीतील अजरामर स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या सांगीतिक कारकिर्दीला आणि त्यांच्या अमर गीतांना अभिवादन करण्यासाठी ‘मेराक’ आणि ‘जीवनगाणी’तर्फे मंगळवार, १२ मे २०२६ रोजी दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले (पूर्व) येथे दोन विशेष संगीतमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
आशाताईंच्या समृद्ध सांगीतिक वारशाला उजाळा देणारे आणि त्यांच्या अजरामर आवाजाला यथोचित अभिवादन करणारे ठरेल.
दुपारी ४.३० वाजता ‘फिरुनी नवी जन्मेन मी’ या विशेष संकल्पनेतून आशाताईंच्या गाजलेल्या व सदाबहार मराठी गीतांचे सादरीकरण करत रसिकांना त्यांच्या सुरेल आठवणींच्या प्रवासात घेऊन जाण्याचा हा प्रयत्न आहे.
या कार्यक्रमात अनेक नामवंत कलाकार सहभागी होणार असून प्राजक्ता सातर्डेकर, केतकी चैतन्य, शाल्मली सुखटणकर, राधिका नांदे, आसावरी जोशी यांच्यासह इतर कलाकारही आशाताईंच्या अजरामर गीतांना स्वर देणार आहेत.
कार्यक्रमाचे संगीत संयोजन अमित गोठीवरेकर यांचे असून निवेदन मिलिंद कुलकर्णी करणार आहेत.
दुसरा कार्यक्रम ‘आशा-आर डी बर्मन – दो लफ़्ज़ों की कहानी..’ रात्री ८.३० वाजता होणार असून त्यात आशा भोसले आणि संगीतसम्राट आर डी बर्मन यांच्या सदाबहार गीतांचा संगीतमय प्रवास उलगडला जाणार आहे.
या कार्यक्रमात प्राजक्ता सातर्डेकर, निहिरा जोशी, निरुपमा डे, सौम्या वर्मा, गुल सक्सेना, श्रीकांत नारायण, राजेश अय्यर आदी कलाकार या गीतांना स्वर देणार आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरजे गौरव करणार आहेत. संगीत संयोजन अविनाश चंद्रचूड तर ताल संयोजन अनुपम घटक यांचे आहे.
दोन्ही कार्यक्रमांची संकल्पना व आयोजन मेराक इव्हेंट्स’च्या मंजिरी हेटे आणि ‘जीवनगाणी’ चे प्रसाद महाडकर यांचे आहे.
‘फिरुनी नवी जन्मेन मी’कार्यक्रमाच्या मोफत प्रवेशिका आणि ‘आशा-आर डी बर्मन : दो लफ़्ज़ों की कहानी..’कार्यक्रमाच्या
प्रवेशिका नाट्यगृहामध्ये उपलब्ध असतील.
अधिकाधिक संगीत रसिकांनी या कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन मे आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.



















