शहरांमध्ये सर्वच गोष्टींची समृद्धता आहे, नाटक आहे चित्रपट आहे, खेळ आहे सामाजिक संस्था यासाठी आघाडीवर असतात ,पण गावात वस्त्यांवर ,पाड्यांवर जाऊन तिथल्या वंचित मुलांसाठी मात्र अजूनही काही गोष्टींची अपूर्णता आहेच ,उदाहरणार्थ नाट्यकला ही प्रामुख्याने आहे,त्यातून मुलांसाठी अशा प्रकारचे उपक्रम राबवणे जास्त गरजेचे आहे, या अशा प्रकारच्या अभिनय कार्यशाळांमधून व्यक्तिमत्व विकसनही होईल ,आपल्या क्षमतांची जाणीवही होईल .आणि मग मुलं गाव पातळीवर, शहर पातळीवर, राज्य पातळीवर सुद्धा आपल्यातील क्षमता कलागुण लोकांच्या समोर आणण्यासाठी पुढे येतील ,ही अशा प्रकारची भावना घेऊन प्रा.देवदत्त पाठक आणि मिलिंद केळकर हे दोघेजण गेल्या बारा वर्षापासून ऐन उन्हात, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये केवळ शहरात अभिनय शिबिर न घेता वाड्या वस्त्यांवर जाऊन वंचित मुलांसाठी अशा प्रकारच्या अभिनय प्रशिक्षण कार्यशाळा घेत आहे,अर्थातच ज्याच्यामध्ये व्यक्तिमत्व विकसन आणि क्षमता विकसनचाही उद्देश महत्त्वाचा घेऊन अशा प्रकारचे काम होत आहे यावर्षी या कार्यशाळा २१एप्रिल पासून पूर्णपणे मोफतआहेत ..आत्तापर्यंत सात कार्यशाळा पार पडल्या .याच पद्धतीने जवळजवळ १२ जून पर्यंत अजून १४कार्यशाळा व तसेच पुणे शहराची आजूबाजूची उपनगरे येथे जाऊन घेण्यात येणार आहेत ,असे प्रा. देवदत्त पाठक यांनी सांगितले आहे
यावर्षी रायगड जिल्ह्यातील अनेक गावे,उदाहरणार्थ माणगाव ,निव , शिरवली वडावळे येथील काही शाळा तसेच सामाजिक कला संस्था यांच्यासाठी घेतल्या गेल्या आहेत ,आणि पुढच्या काळात त्या हडपसर, पिंपरी चिंचवड, आंबेगाव, मांजरी येथे या कार्यशाळा घेण्यात येणार आहेत , स्वाधार, वंचित विकास, गुरु स्कूल
गुफान यांनी या कार्यशाळा घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
मोठमोठ्या शहरांमध्ये सर्व गोष्टींची उपलब्धता आहे ,पण गावात ,वस्त्यांवर अशा प्रकारचे रंगभूमी कलेचे काम होणे अत्यावश्यक आहे त्यातून वर्तन दुरुस्तीचे व कला संवर्धनाचे संस्कार होतील ,या हेतूने प्रा. देवदत्त पाठक आणि मिलिंद केळकर आणि गुरुस्कूल गुफान ची टीम रंगमंचीय खेळ ,रंगभूमी पाठ, प्रात्यक्षिके, प्रयोग सादरीकरण या पद्धतीने कार्यशाळा घेत आहेत.. डॉ. अजय मोरे निशा महागावकर ,संगीता वरदे ,अंजली बापट, निर्मला राऊत ,उषा देशपांडे, ऋतुजा केळकर, वैशाली कंक,यांच्या संयोजनातून या कार्यशाळा होत आहेत ..
Home नाटक / चित्रपट / मालिका / समीक्षा प्रा .देवदत्त पाठक यांच्या वंचितांसाठी २१ मोफत अभिनय कार्यशाळा

















