Home मुंबई *’सहकारी महाराष्ट्र’ चे सोमवारी सहकार राज्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन*

*’सहकारी महाराष्ट्र’ चे सोमवारी सहकार राज्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन*

11
0

मुंबई – महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचा १०७ व सहकारी महाराष्ट्राचा ६७ वर्षाचा वारसा असलेले सहकार चळवळीचे मुखपत्र ‘सहकारी महाराष्ट्र’चे उद्या सोमवार दि. २७ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १ वाजता राज्याचे सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या शुभहस्ते प्रकाशन पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे व मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर असणार आहेत.

मुंबई जिल्हा बँकेच्या फोर्ट येथील मुख्यालयातील पद्मश्री वसंतदादा पाटील सभागृहात पार पडणाऱ्या या प्रकाशन सोहळ्याला महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासकीय मंडळ अध्यक्ष विद्याधर अनास्कर, राष्ट्रीय सहकारी संघाचे अध्यक्ष (दिल्ली) संजीव कुसाळकर, महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे तज्ज्ञ संचालक शिवाजीराव नलावडे, मुंबई जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, आमदार प्रसाद लाड, आमदार सुनील राऊत, महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे संचालक नंदकुमार काटकर, सहकारी संस्थांचे विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील, महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह कंझ्युमर फेडरेशनचे अध्यक्ष विठ्ठलराव भोसले, हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजक राज्य सहकारी संघाचे उपाध्यक्ष अर्जुनराव बोरुडे, मानस सचिव रामदास मोरे, संचालक प्रकाश दरेकर, अनिल गजरे, नितीन बनकर, विष्णू घुमरे, जयश्री पांचाळ यांनी दिली.

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here