आता स्वतःच कबुल करतात की, २२ हजार बोगस मतदार आहेत !
वाढलेल्या मतदारांची निवडणूक आयोगाकडून कशाला, सत्तारुढ पक्षानेच कबुली दिली !
शिवसेना नेते, माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांचे, सडेतोड पत्रक
महाराष्ट्र भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांना आणून धुळे जिल्हा भाजपाने आपण कुठल्या पातळीवर आहोत हे सिद्ध करुन दिल्याबद्दल त्यांचे मी मनः पुर्वक आभार मानतो. या किरिट सोमय्यांचाच एक व्ही.डी.ओ. या पत्रकात मी दिला आहे.
यु-ट्यूब व्हीडीओ लिंक (लिंक वर क्लिक करुन व्हीडीओ पहा) https://youtu.be/nQN7AauSG7Q?si=FyirpFSwCjSvLpVu
अशा व्यक्तीला निमंत्रित करुन भाजपाने सिद्ध करुन दिले, गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपाचा हाच कार्यक्रम सर्वत्र राबविला जात आहे. धुळ्यात येवून सोमय्यांनी एक प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, अनिल गोटेंनी निवडणूक आयोगाकडे पुराव्यासह तक्रार केली नाही.
खरे तर, ही चुक सोमय्यांची नसून, भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाची आहे. त्यांनी आणलेल्या “छू!” नेत्यांना “छू!” करण्यापुर्वी कल्पना द्यायला हवी होती की, नेमकी काय परिस्थिती आहे.
विधानसभेच्या निवडणूका राज्यात एकाच दिवशी पार पडल्या, मालेगांव मतदार संघातील २२ हजार मतदार धुळ्यात नोंदवले होते. अशी माहीती त्यांनी दिली. ही माहीती अतिशय संतापजनक आहे. २२ हजार काय? २ हजार मतदार मालोगावातही आहेत आणि धुळ्यातही आहेत हे सिद्ध करुन दिले असते, त्याचे पुरावे दिले असते तर, कोणी विश्वात तरी ठेवला असता, मी ४५ हजार पैकी २७ मतदार हे बोगस, दुबार मतदार आहेत हे पुराव्यानिशी सिद्ध करुन दिले, एवढेच नव्हे तर, सर्व कागदपत्रे पत्रकारांसाठी खुली करुन दिली. त्याच्या प्रती त्यांना दिल्या. निवडणूक आयोगाकडे पुराव्यासह तक्रार केली. आोगाने पण, कुठल्याही प्रश्नाला हिंदु-मुस्लिम स्वरुप देवून भावना भडकवित रहाणे हा भाजपाचा देशव्यापी एककल्यी कार्यक्रम आहे.
ते पुढे म्हणतात की, अनिल गोटे यांनी पाठपुरावा केला नाही. दखलही घेतली नाही. अरे लबाडांनो! तुम्ही माझ्याकडून कागदपत्रे मागितली असती तरी मी तुम्हाला दिली असती पण, तुमचा हेतु स्वच्छ नाही. माझ्यासारख्या राजकीय कार्यकर्त्यांनी स्वच्छ मनाने सांगितले की, आम्ही केलेल्या आरोपाची ही चौकशी करा आणि अनिल गोटे यांनी केलेल्या आरोपाची चौकशी करा ! पण असे करण्याचा मनाचा मोठेपणा, शुद्र आणि कुपमुंडूक प्रवृत्तीच्या नेत्यांकडून येणार तरी कुठून? विधानसभा झाली. महापालीका झाली. आता लागले बौबलायला. यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा !
४५ हजारावरुन २२ हजार पर्यंत आले. हेही नसे थोडके ! एक शिक्षणाधिकारी, एका शाळेत पहाणी करण्यासाठी गेले. त्यांनी विद्यार्थ्यांना विचारले बे सख? सर्व विद्यार्थी एका सुरात म्हणाले १५. वर्ग शिक्षक म्हणाले ‘व्वा! शाब्बास!.’ शिक्षणाधिकाऱ्यांना प्रश्न पडला आणि त्यांनी मास्तरांना बे सख १५ होतात का? तर शिक्षकाने दिलेले उत्तर फार मजेशीर आहे. ते म्हणाले, साहेब ! मागच्या महिन्यात १८ म्हणत होते. आता १५ वर आले. हळू-हळू येतील १२ वर.
आज वर्गातील विद्यार्थ्यांसारखी भाजपाची अवस्था झाली आहे. अर्थात यातील मार्मीक टिका समजण्याची बुद्धी परमेश्वराने त्यांना द्यावी एवढीच मी सदिच्छा व्यक्त करु शकतो.
असे सडेतोड पत्रक अनिल अण्णा गोटे यांनी आज प्रसिद्धीसाठी दिले आहे.





















