मुंबई – मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील वॉर्ड क्रमांक २५ च्या कार्यसम्राट नगरसेविका निशा परुळेकर-बंगेरा यांच्या नेतृत्वाखाली आणि भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षातील महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गुरुवारी भाजपचे कमळ हाती घेतले. या भव्य पक्ष प्रवेशामुळे मागाठाणे विधानसभा क्षेत्रात भाजपात बळकटी निर्माण झाली आहे.
शिवसेनेच्या महिला शाखाप्रमुख प्रीती इंगळे, शाखा समन्वयक स्वाती अवताडे, कार्यालय प्रमुख कुसुम बोक्का यांच्या मार्गदर्शनाखाली उपशाखाप्रमुख माधुरी साटम, अनिता शर्मा, शुभांगी साईल, मीना कांबळे, विशाखा कांबळी, अर्चना भादवणकर, वंदना हाडपे, मिरा पोपळे, सुधाली तावडे, कल्पना गायकवाड, ताजबी शेख, क्रांती बिष्णोई, गटप्रमुख पूनम गौड, श्रेया दुबे, अर्चना दुबे, लता खोडवे, रीमा गुप्ता, सुजाता सकपाळ, नीला कलाल, गजा बरंवाल, अर्चना मिश्रा, संतोषी पवार, प्रिया मेस्त्री, किरण दिगर्से, करुणा कटके, सुजाता पवार, मीना गुप्ता यांनी भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला. यावेळी आ. दरेकर यांनी पक्षात सहभागी झालेल्या सर्व महिला कार्यकर्त्यांचे स्वागत केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर, वॉर्ड क्र.२५ च्या नगरसेविका निशा परुळेकर-बंगेरा, भाजपा उत्तर मुंबई जिल्हा महामंत्री आप्पा बेलवलकर, महिला जिल्हा अध्यक्षा शीतल आंब्रे, जिल्हा उपाध्यक्षा प्रिया मिटके, मागाठाणे विधानसभा संयोजक कृष्णकांत दरेकर, मागाठाणे दक्षिण विधानसभा अध्यक्ष अविनाश राय, वॉर्ड अध्यक्ष पवन तिवारी, महिला वॉर्ड अध्यक्षा सुनयना कदम, युवा अध्यक्ष अभिषेक पवार यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
00000




















