Home मुंबई *महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ...

*महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत ‘गोंधळ’ चित्रपटाचे प्रदर्शन*

7
0

मुंबई २३: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ अंतर्गत दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ आयोजित ‘गोंधळ’
या चित्रपटाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या चित्रपटाचे प्रदर्शन शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ४ वाजता लघु नाट्यगृह, तिसरा मजला,पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई येथे होणार आहे.

गोंधळ’ हा डावखर प्रस्तुत मराठी चित्रपट असून, त्याचे दिग्दर्शन संतोष डावखर यांनी केले आहे. या चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निशाद भोईर, अनुज प्रभू, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, ऐश्वर्या शिंदे, कैलास वाघमारे, प्रभाकर माथपती, विठ्ठल काळे, प्रदीप दळिंबकर, शरद जाधव आणि पूनम पाटील हे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये आहेत.

‘गोंधळ’ हा चित्रपट पाहण्यासाठी सिनेप्रेमीनी उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रवेश – सभासदांसह प्रथम येणाऱ्यास प्राधान्य असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here