Home नाटक / चित्रपट / मालिका / समीक्षा *सोन्यासाठी विहिरीत उतरले संदीप पाठक*

*सोन्यासाठी विहिरीत उतरले संदीप पाठक*

8
0

*‘घबाडकुंड’ मध्ये संदीप पाठक चा भन्नाट अंदाज*

चाकोरीबाहेरील विषयांना प्राधान्य देत प्रभावी भूमिका साकारणाऱ्या कलाकारांमध्ये अभिनेता संदीप पाठक यांचं नाव आवर्जून घेतलं जातं.

आता मात्र प्रेक्षकांना संदीप पाठक यांचा एकदम वेगळा अंदाज पाहायला मिळणार आहे. सोन्याच्या मोहात ते चक्क एका गूढ विहिरीत उतरले आहेत. पण हे सोनं नेमकं काय आहे? आणि त्यामागचं रहस्य काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ‘घबाडकुंड’ या चित्रपटातून उलगडणार आहेत. संदीप पाठक यांच्या ‘दिल्या’ या व्यक्तिरेखेचा अचंबित करणारा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यामध्ये संदीप पाठक यांचा आजवर न पाहिलेला भन्नाट अवतार समोर आला आहे.

ओरस गावातील ‘अल्याड-पल्याड’च्या गूढ आणि थरारक घटनांमधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारा ‘दिल्या’ आता ‘घबाडकुंड’ युनिव्हर्समधील नव्या कथेत पुन्हा एकदा भेटणार आहे. भुतांच्या भयावह अनुभवांनंतर गाव सोडून नव्या ठिकाणी स्थायिक झालेल्या दिल्याची ही कहाणी ‘घबाडकुंड’ चित्रपटाच्या युनिव्हर्सला अधिक गूढ आणि रोमहर्षक बनवणार आहे. ‘घबाडकुंड’ या नव्या चित्रपटातून कल्पनेच्या पलीकडचं ‘युनिव्हर्स’ मराठीत मोठ्या पडद्यावर साकारण्याचा धाडसी प्रयत्न दिग्दर्शक प्रितम एस. के. पाटील यांनी केला असून त्यांच्या या नव्या संकल्पनेला आयकॉन दी स्टाईल’ संस्थेचे निर्माते डॉ.रसिक कदम यांची साथ लाभली आहे. ‘घबाडकुंड’ येत्या १९ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here