Home मुंबई *अशी मुलगी एखाद्याला नशिबानेच मिळते… उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून डॉ. ममता शिवतारे...

*अशी मुलगी एखाद्याला नशिबानेच मिळते… उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून डॉ. ममता शिवतारे यांचे कौतुक*

19
0

*उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉल करून केली आमदार विजयबापू शिवतारे यांच्या तब्येतीची विचारपूस*

*लवकरच पुर्ण बरे होऊन जनसेवेसाठी कार्यरत होण्यासाठी दिल्या शुभेच्छा*

दरे ( महाबळेश्वर)
“अशी मुलगी एखाद्याला नशिबानेच मिळते.” असे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार विजयबापू शिवतारे यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच आता लवकरच बरे होऊन पुन्हा एकदा पुर्ण ताकतीने जनसेवेसाठी कार्यरत व्हावे अशी अपेक्षाही शिंदे यांनी व्यक्त केली. दरे गावातून शिंदे यांनी व्हिडीओ कॉलद्वारे त्यांच्याशी संवाद साधला.

पुरंदरचे शिवसेनेचे आमदार विजयबापू शिवतारे यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याने त्यांच्यावर तातडीने किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी त्यांची मुलगी डॉ. ममता यांनी पुढाकार घेऊन त्यांना आपली एक किडनी दान केली. एक मुलगी आणि एक डॉक्टर म्हणून त्यांनी आपल्या जन्मदात्याला किडनी दान करून त्यांना पुनर्जन्म दिला. याबद्दल शिंदे यांनी शिवतारे यांचे कौतुक केले.

३१ मार्च रोजी ही शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर तुमची भेट घ्यायला रुग्णालयात येणार होतो मात्र, संसर्ग होण्याची भीती असल्याने डॉक्टरांनी तशी परवानगी आपल्याला दिली नाही. मात्र लवकरच मुंबईत परतल्यावर तुम्हाला नक्की भेटायला येईन असेही शिंदे यांनी शिवतारे यांना सांगितले.

आपल्याला मिळालेला हा पुनर्जन्म असून यापुढे बरा होऊन पुर्ण ताकतीने पक्षासाठी आणि मतदारसंघातील लोकांच्या सेवेसाठी कार्यरत होईन. असे शिवतारे यांनी शिंदे यांना यावेळी सांगितले. तर शिंदे यांनीही त्यांना “लवकरात लवकर पुर्ण बरे व्हा आणि कामाला सुरवात करा मी तुमच्या पाठीशी कायम आहे.” असे सांगत त्यांना उत्तम निरोगी दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here