एक मे पासून रिक्षा टॅक्सी ड्रायव्हर यांना परवाना काढताना किंवा नूतनीकरण करताना मराठी येणे अनिवार्य. अन्यथा परवाने मिळणार नाहीत….*
यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे अभिनंदन शिवसेना राज्य प्रवक्ते अरुण सावंत यांनी केले आहे.
अबू आजमी हे मुस्लिम समाजाचे नेते आहेत. त्यांनी लगेच या निर्णयाला विरोध करून ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांना भडकावण्याचं काम सुरू केलेले आहे. असे मत व्यक्त करुन अबु आझमी यांच्या या भडकावू भूमिकेचा समाचार घेताना म्हटले की,”त्यांनी पुनश्च एकदा मराठी बंधनकारक करण्याला विरोध केला आहे
मात्र महाराष्ट्र राज्यातील प्रत्येकाबरोबर बोलताना जुजबी मराठी ही आलीच पाहिजे जेणेकरून परप्रांतीयांचा सुद्धा त्यात फायदा होईल त्यांच्याबद्दल आपुलकी वाटेल त्यांचा धंदा वाढेल.
परप्रांतीय या राज्यात उदरनिर्वाहासाठी रोजगारासाठी येतात त्यांचे स्वागत आहे. मग त्यांनी या राज्यातील मराठी ही शिकलीच पाहिजे.
प्रत्येक राज्यात त्या-त्या राज्याची भाषा बोलली जाते परप्रांतीय सुद्धा त्या राज्यातील भाषेला मानसन्मान देतात तर मग अबू आजमी परप्रांतीयांना का भडकावीत आहे ?
अबू आजमी यांनी परप्रांतीयांना भडकावून, मराठीच्या विरोधात उभे करून, प्रकाश झोतात राहण्याचा प्रयत्न केला तर या महाराष्ट्रातील आणि खास करून मुंबईतील जनता त्यांच्या श्रीमुखात वेळोवेळी हाणत राहील याबद्दल शंकाच नाही.
असेही सावंत यांनी म्हटले आहे.















