Home मुंबई *यशवंतराव चव्हाण विद्यालय, अकोट येथील नवीन बांधकाम परवानगी प्रस्तावाबाबत मंत्री जयकुमार गोरे...

*यशवंतराव चव्हाण विद्यालय, अकोट येथील नवीन बांधकाम परवानगी प्रस्तावाबाबत मंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक*

6
0

मुंबई | दि. २८ जुलै २०२६ : शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती संचलित यशवंतराव चव्हाण विद्यालय, अकोट (जि. अकोला) यांच्या ताब्यात असलेल्या सिटी सर्व्हे क्र. २८, प्लॉट क्र. १८१ येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीसह खुल्या जागेवरील नवीन बांधकाम परवानगीच्या प्रस्तावासंदर्भात आज मंत्रालयात ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली.

यावेळी संबंधित प्रकरणातील सर्व कागदपत्रांची सखोल पडताळणी करण्यात यावी, संबंधित पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात यावे तसेच संबंधित मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची तपासणी करून वस्तुनिष्ठ अहवाल शासनास सादर करावा, असे निर्देश मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.

संबंधित अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यातील निष्कर्षांच्या आधारे नियमानुसार पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असेही मंत्री गोरे यांनी स्पष्ट केले.

बैठकीस सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार तसेच ग्रामविकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

000 00

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here