Home नाटक / चित्रपट / मालिका / समीक्षा *सोशल सर्विस लीग शाळेचे शिक्षक विजय सावंत साने गुरुजी पुरस्काराने सन्मानित*

*सोशल सर्विस लीग शाळेचे शिक्षक विजय सावंत साने गुरुजी पुरस्काराने सन्मानित*

8
0

“हा माझा एकट्याचा सन्मान नसून ज्या संस्थेने आपल्या शाळेत मला शिकविण्याची संधी उपलब्ध करून दिली त्या सोशल सर्विस लीग संस्थेचा व पर्यायाने माझ्या विद्यार्थ्यांचाही सन्मान आहे असे मी समजतो.कारण रात्र शाळेत येणारे सगळे विद्यार्थी हे वयाने खूप मोठे असतात दिवसाला कुठेतरी काम करत असताना आपल्या अपूर्ण राहिलेल्या शिक्षणाचा ध्यास घेऊन मोठे होण्याची स्वप्न उराशी बाळगून ते रात्र शाळेत प्रवेश घेतात व यशस्वी होतात.” मुंबई सायन येथील ‘लक्ष्मी शैक्षणिक संस्था’ यांनी आयोजित केलेल्या इंग्रजी शिक्षकांसाठी ‘गुणवत्ता शिक्षक पुरस्कार’ स्वीकारल्यानंतर ते बोलत होते.
लक्ष्मी शैक्षणिक संस्था ही सन २०१८ पासून मुंबईतील मराठी हिंदी व उर्दू माध्यमातील शाळातील विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाची गोडी उत्पन्न व्हावी म्हणून विविध उपक्रम वर्षभर राबवते तसेच इंग्रजी संभाषण स्पर्धा व निबंध स्पर्धा, आदर्श शाळा स्पर्धा,इंग्रजी विषयाच्या शिक्षकांचा गुणगौरव इत्यादी उपक्रम राबविते.नुकताच त्यानी सन २०२५ साठीच्या पुरस्कारांचे वितरण राज्याचे अवर सचिव उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य प्रवीण सिंधुबाई राजाराम मुंढे यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे केले.या वेळी आदर्श शाळा, उपक्रमशील शिक्षक यांचाही सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सुनील आहेर,संजय मराठे ज्ञानेश्वर महाजन इत्यादी पदाधिकारी विद्यार्थी पालक मुख्याध्यापक संस्था प्रमुख व शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.

विजय सावंत सिंधुदुर्ग जिल्यातील दोडामार्ग तालुक्यातील कुंब्रल गावचे सुपुत्र असून ते व्यवसायाने शिक्षक आहेत.S.C.R.T,पुणे M.E.P.A. औरंगाबाद, R.A.A.औरंगाबाद नाशिक इत्यादी ठिकाणी राज्य स्तरावर त्यांनी इंग्रजी व इतर विषयासाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले आहे. तसेच पाठ्य पुस्तकातील क्युआर कोड तयार करण्यासाठी मदत केल्याबद्दल शिक्षण मंत्र्यानी प्रशस्ती पत्रक देऊन त्याना सन्मानीत केले आहे.तसेच त्यांचे ‘प्रकाश किरणाच्या शोधात’ व ‘ जगण्याचे आर्त’ असे दोन कवितासंग्रह
प्रसिद्ध झाले असून एक कथासंग्रह प्रकाशनाच्या मार्गांवर आहे.यापुर्वी त्यांना ‘एकता कल्चरल अकादमी’ मुंबई यांचा ‘महात्मा ज्योतिबा फुले पुरस्कार’ व ‘अहिल्या शिक्षण संस्था’ मुंबई यांचा ‘गुणवंत शिक्षक पुरस्कार’ प्राप्त झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here