मुंबई
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘आठवणीतले बाळासाहेब’ या विषयावरील व्याख्यानाने शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ पासून जय महाराष्ट्र नगर बोरीवली पूर्व येथे जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमाला सुरु होत असून दि २४ २५,२६ एप्रिल असे तीन दिवस या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. माजी केंद्रीय मंत्री, शिवसेना नेते खा. अरविंद सावंत, ज्येष्ठ पत्रकार आणि बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय कुमार कदम, दैनिक सामना या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरु केलेल्या शिवसेनेच्या मुखपत्रावर लोकमान्य टिळक विद्यपीठाची डॉक्टरेट पदवी प्राप्त झालेले ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुकृत खांडेकर हे शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ रोजी आठवणीतले बाळासाहेब या विषयावर शिवसेनाप्रमुखांच्या आठवणी सांगून जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफतील. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या अपरिचित कवितांचे वाचन कु. कांचन सावंत या शनिवार, २५ एप्रिल २०२६ रोजी करणार असून , निवेदिका दिपाली केळकर या कवितांशी संबंधित निवेदन करणार आहेत. रविवार, २६ एप्रिल २०२६ रोजी प्रथितयश गायक मंदार आपटे यांचा सुप्रसिद्ध ‘ कितीदा नव्याने तुला आठवावे ‘ या संगीतमय कार्यक्रमातून मराठी आणि हिंदी गीतांचा नजराणा पेश करतील. जय महाराष्ट्र नगर बोरीवली चे भाग्यविधाते ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पत्रकार विजय वैद्य यांनी सुरु केलेल्या या जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेचे यंदाचे ४४ वे वर्ष असून एकता विनायक चौक, जय महाराष्ट्र नगर बोरीवली पूर्व येथे रोज सायंकाळी साडेसात वाजता ही व्याख्यानमाला होणार आहे.
Home मुंबई *’आठवणीतले बाळासाहेब’ या व्याख्यानाने जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेचा शुभारंभ ;दि. २४,...





















