Home Uncategorized अंबाजोगाईत चिमुरडीचा धक्कादायक मृत्यू;अत्याचाराचा पर्दाफाश,उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची कडक भूमिका!

अंबाजोगाईत चिमुरडीचा धक्कादायक मृत्यू;अत्याचाराचा पर्दाफाश,उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची कडक भूमिका!

28
0

अंबाजोगाईत चिमुरडीचा धक्कादायक मृत्यू;अत्याचाराचा पर्दाफाश,उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची कडक भूमिका

मुंबई
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात घडलेल्या २ वर्षे ५ महिने वयाच्या चिमुरडीवरील अत्याचार व मृत्यूची घटना अत्यंत संतापजनक असल्याचे सांगत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रशासनाला तातडीने कठोर कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत.

प्राथमिक तपासात मृत्यू अपघाती असल्याचे सांगण्यात आले होते; मात्र शवविच्छेदन अहवालातून लैंगिक अत्याचार स्पष्ट झाल्याने प्रकरण गंभीर झाले असून, हा अहवाल महत्त्वाचा पुरावा ठरत आहे. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले असून गुन्ह्याची नोंद भारतीय न्याय संहिता २०२३ व बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (POCSO) कायद्यानुसार करण्यात आली आहे.

घटनेची गांभीर्याने दखल घेत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे या प्रकरणाचा तपास जलदगती न्यायालयात चालवून आरोपीस कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. तसेच तपास पारदर्शक ठेवून सर्व वैद्यकीय व भौतिक पुरावे भक्कमपणे सादर करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

आरोपी अल्पवयीन असल्याने त्याच्यावर कायद्यानुसार बाल सुधारगृहात ठेवण्याची प्रक्रिया काटेकोरपणे राबवावी, असे त्यांनी नमूद केले.

पीडित कुटुंबाला समुपदेशन व सुरक्षा देण्याबरोबरच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी बालसुरक्षा व जनजागृती मोहिमा राबविण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here