Home पुणे एपस्टीनचा कोठडीत मृत्यू, अशोक खरातचे काय? :सुनील माने

एपस्टीनचा कोठडीत मृत्यू, अशोक खरातचे काय? :सुनील माने

116
0

पुणे
महाराष्ट्रातील भोंदू बाबा अशोक खरात याला पोलिसांनी अटक केली आहे. महाराष्ट्राचा एपस्टीन म्हणून त्याला सध्या संबोधले जाते. खरातकडे अनेक हायप्रोफाइल लोक येत होते. या लोकांची नावे समोर येऊ नयेत यासाठी त्याच्या जीवाला धोका पोहचू शकतो. एपस्टीनप्रमाणे त्यालाही तुरुंगात मारले जाऊ शकते. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास होऊन त्याच्याकडे येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची नावे समोर येत नाहीत तोपर्यंत त्याला सुखरूप ठेवावा,अशी मागणी आज राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्ते सुनील माने यांनी मुख्यमंत्री तसेच पोलिस प्रशासनाकडे केली आहे.
सुनील माने म्हणाले, जगभरात जेफ्री एडवर्ड एपस्टीन हे नाव गाजत आहे. एपस्टीन हा अमेरिकेतील एक बाल लैंगिक गुन्हेगार होता. त्याच्याकडे जगभरातील अनेक व्हीआयपी येत होते. त्यांची यादी आत्ता समोर येत आहे. त्याने केलेल्या कृत्यामुळे न्यूयॉर्क पोलिसांनी त्याला अटक केली होती. मात्र तुरुंगात त्याचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यामुळे त्यावेळी त्याच्याशी संबंधित अनेक लोकांची नावे समोर आली नाहीत. याप्रमाणेच ज्याला महाराष्ट्राचा एपस्टीन म्हणता येईल अशा अशोक खरातकडे सुद्धा अनेक महत्त्वाच्या व्यक्तींचा राबता होता. तो ज्योतिष सांगण्याच्या बहाण्याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण करत होता. आतापर्यंत त्याच्याकडे १०० हून अधिक क्लिप सापडल्या आहेत. यात अनेक व्हीआयपी लोक अडकले आहेत त्यामूळे ही हायप्रोफाईल केस आहे. आपली नावे उघड होण्याची भीती त्यांना असल्याने त्याला तुरुंगात मारले जाऊ शकते. असे झाल्यास त्याच्यासोबत आणखी कोण आहे याची माहिती समोर येणार नाही. ही माहिती समोर येण्यासाठी तुरुंगात ही त्याला सुरक्षित ठेवले पाहिजे. उद्या त्याचा तुरुंगात संशयास्पद मृत्यु झाला अशी बातमी येऊ नये याची काळजी घ्यावी,अशी मागणी माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पोलिस प्रशासनाला केली आहे.
—————————

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here