नाशिक,दि.२८: नाशिक येथे सुरू असलेल्या चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचा उद्या (दि.१ मार्च) रोजी ‘मराठी भाषेतील युवा वर्गाचा सहभाग’ या चर्चासत्रात उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे विचार मांडणार आहेत. हा कार्यक्रम, शाहीर वामनदादा कर्डक मंच, रावसाहेब थोरात सभागृह येथे सकाळी १० ते ११.३० वाजता होणार आहे. अभिजीत ब्रह्मनाथकर हे या चर्चासत्राचे संवादक असतील.
युवा पिढीला मराठी भाषेशी जोडण्यासाठी आणि त्यांचा साहित्यातील सक्रिय सहभाग वाढवण्यासाठी हे चर्चासत्र महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
हे संमेलन २६ फेब्रुवारीपासून सुरू झाले असून, मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा जागतिक प्रचार व प्रसार करण्यासाठी राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने के.टी.एच.एम. महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले आहे. संमेलनात विविध परिसंवाद, व्याख्याने, पुरस्कार वितरण आणि सांस्कृतिक कार्यक्रम झाले आहेत.
——




















