छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार , दि. २० फेब्रुवारी २०२६ रोजी,सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्था आयोजित डॉ. जी. डी. पोळ फाउंडेशन वाय. एम. टी. आयुर्वेदिक हॉस्पिटल यांच्या सहकार्याने “मोफत वेदनामुक्ती चिकित्सा शिबीर” आयोजित करण्यात आले होते. या शिबीरात मानेचे दुखणे, पाठीचे दुखणे, कंबरेचे दुखणे, गृध्रसी, खांदा दुखणे, टाचदुखी, कोपऱ्याचे दुखणे, मनगट दुखणे, यांसाठी अग्नीकर्म चिकित्सा, विद्यकर्म चिकित्सा, मर्म चिकित्सा आदी. करण्यात आले. शल्यतंत्र विभागाच्या चिकित्सक प्रा. डॉ. शुभांगी बदोले यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या शिबिराला डॉ. विवेक पवार, डॉ. शुभांगी गाडेकर, डॉ. वैशाली बघेले, डॉ. निलेश कांबळे, आर. एम. ओ. डॉ. आरती नांदेडकर, डॉ. पल्लवीच लोखंडे, डॉ. सुहास गावडे, जयश्री होवाळ उपस्थित होते. हे शिबिर ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्था, खारघर, घरकुल शॉपिंग सेंटर, सेक्टर – १५, खारघर, नवी मुंबई या ठिकाणी करण्यात आले. श्री. ह. भ. प. प्रकाश कर्णे यांनी शॉल्स आणि टेबल क्लॉथ संस्थेला भेट दिली. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्था, खारघर यांचे अध्यक्ष एम. डी. सोनवणे, सचिव ए. डी. बोऱ्हाडे, खजिनदार संतोष मोहिते, उपाध्यक्ष विश्वनाथ एंडे, सदस्य मुकुंद सोनवणे, उत्तम मुगदल, सोपान जगताप, नंदन मोहिते, अशोक कांबळे, श्रीनिवास सकट, अर्जुन वाघमारे, अजित धुमाळ तसेच कार्यकारणी मंडळ आणि सर्व सदस्य यांनी मेहनत घेतली. खारघरमधील नागरिकांचा या वेदनामुक्ती चिकित्सा शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.



















