Home मुंबई शिमग्याला कोकणात जाण्यासाठी थेट रो-रो सेवा! १मार्चपासून सुरुवात!

शिमग्याला कोकणात जाण्यासाठी थेट रो-रो सेवा! १मार्चपासून सुरुवात!

58
0

मुंबई : शिमग्याला (होळीला) कोकणात जाणाऱ्या कोंकणवासीयांसाठी दिलासादायक माहिती आली आहे.
मुंबई ते (विजयदुर्ग) सिंधुदूर्ग रो-रो सेवेचा शुभारंभ येत्या दि.१ मार्च २०२६ रोजी सुरू होणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे. लवकरच ऑनलाइन तिकीट बुकिंग आणि विक्रीलाही सुरुवात करण्यात येईल. त्यामुळे आता रेल्वे आणि रस्ते मार्गे जाण्यासोबतच चाकरमान्यांना अवघ्या काही तासांत या रो-रो ने कोकणात जाणे शक्य होईल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुंबई ते कोकण समुद्रामार्गे प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील होते. यादृष्टीने मंत्री नितेश राणे यांच्या बंदरे विकास विभागाला केंद्रीय नौकानयन मंत्रालयाकडून तसेच विविध यंत्रणांकडून रो-रो सेवेसाठी अत्यावश्यक असणाऱ्या एकूण १४७ परवानग्या प्राप्त झाल्या आहेत.
२५ नॉट्स स्पीडची ही ‘एम-टू-एम’ नावाची रो-रो बोट दक्षिण आशियातील वेगवान प्रवासी बोट आहे. यामध्ये इकोनॉमी वर्गात ५५२ आसनांची व्यवस्था, प्रिमीयम इकॉनॉमीमध्ये ४४, बिझनेसमध्ये ४८, तर फर्स्ट क्लासमध्ये १२ प्रवाशांची क्षमता असणार आहे. तर,५० चार चाकी, ३० दुचाकी क्षमता असलेली ही रो-रो आहे. मागील काही दिवसांपासून या रो-रोच्या चाचण्या देखील सुरु आहेत. यशस्वी चाचण्यांनंतर ही रोरो सेवा येत्या १ मार्चपासून सुरू होणार आहे.

*कसा असणार प्रवास?*

भाऊचा धक्का (मुंबई) ते विजयदुर्ग (सिंधुदुर्ग) ७ तासांचा प्रवास करता येणार आहे. येथे जेट्टीची सुविधा असून, जेट्टीवरून शहरात जाण्यासाठी बसेसची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. १ मार्च रोजी मुंबईहून सकाळी ८ वाजता निघालेली रो-रो दुपारी ३ वाजता विजयदुर्गला पोहोचेल. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच २ मार्च रोजी दुपारी १२ वाजता विजयदुर्गहून निघालेली रो-रो संध्याकाळी ७ :०० वाजता मुंबईला पोहोचेल. असे नियोजन एक मार्च ते २६ मार्चपर्यंत करण्यात आले आहे.

*M2M प्रिन्सेस – प्रवास वेळापत्रक*

मार्ग: मुंबई ⇄ विजयदुर्ग

महिना: मार्च २०२६

तारीख वार पासून सुटण्याची वेळ पर्यंत पोहोचण्याची वेळ
१ मार्च रवि मुंबई ०८:०० विजयदुर्ग १५:००
२ मार्च सोम विजयदुर्ग १२:०० मुंबई १९:००
४ मार्च बुध मुंबई ०८:०० विजयदुर्ग १५:००
५ मार्च गुरु विजयदुर्ग १२:०० मुंबई १९:००
७ मार्च शनि मुंबई ०८:०० विजयदुर्ग १५:००
८ मार्च रवि विजयदुर्ग १२:०० मुंबई १९:००
११ मार्च बुध मुंबई ०८:०० विजयदुर्ग १५:००
१२ मार्च गुरु विजयदुर्ग १२:०० मुंबई १९:००
१४ मार्च शनि मुंबई ०८:०० विजयदुर्ग १५:००
१५ मार्च रवि विजयदुर्ग १२:०० मुंबई १९:००
१८ मार्च बुध मुंबई ०८:०० विजयदुर्ग १५:००
१९ मार्च गुरु विजयदुर्ग १२:०० मुंबई १९:००
२१ मार्च शनि मुंबई ०८:०० विजयदुर्ग १५:००
२२ मार्च रवि विजयदुर्ग १२:०० मुंबई १९:००
२५ मार्च बुध मुंबई ०८:०० विजयदुर्ग १५:००
२६ मार्च गुरु विजयदुर्ग १२:०० मुंबई १९:००

सूचना:

• प्रवाशांनी सुटण्याच्या वेळेपुर्वी किमान ९० मिनिटे आधी उपस्थित राहावे.
• हवामान, बंदर परिस्थिती व प्रशासकीय मान्यतेनुसार वेळापत्रकात बदल होऊ शकतो.
• सर्व वेळा भारतीय प्रमाणवेळ (IST) नुसार आहेत.

प्रवाशांनी प्रस्थानाच्या किमान ९० मिनिटे आधी रिपोर्ट करण्याची विनंती करण्यात आली आहे. हवामान, बंदर आणि ऑपरेशनल मंजुरींच्या अधीन वेळापत्रक असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here