Home मुंबई अवैध नागरिकांना दिलेली बोगस २३७ जन्म प्रमाणपत्र एक महिन्यात ताब्यात घ्या –...

अवैध नागरिकांना दिलेली बोगस २३७ जन्म प्रमाणपत्र एक महिन्यात ताब्यात घ्या – महापौर रितू तावडे

53
0

*बेकायदा फेरीवाले यांचे जन्मप्रमाणपत्र तपासणार!*

मुंबईमध्ये अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या नागरिकांना दिलेली बोगस २३७ जन्म प्रमाणपत्र आरोग्य विभागाने एक महिन्याच्या आत ताब्यात घ्यावी तसेच फेरीवाले यांचे जन्मप्रमाणपत्र तपासणार असल्याचे प्रतिपादन महापौर रितू तावडे केले.

बोगस जन्म प्रमाणपत्र तपासणी,
विशेषतः बांगलादेशी फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचा निर्धार महापौर रितू तावडे यांनी काही दिवसापूर्वी व्यक्त केला होता. त्याच अनुषंगाने महानगरपालिका मुख्यालयातील महापौर दालनात शुक्रवार दि १३ फेब्रुवारी २०२६ रोजी संबंधित अधिकाऱ्यांची आढाव बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत महापौर बोलत होत्या.
याप्रसंगी उप महापौर संजय घाडी, भाजपचे गटनेते गणेश खणकर, माजी खासदार किरीट सोमय्या, नगरसेवक सर्वश्री. निल सोमय्या, प्रकाश गंगाधरे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य)श्री. शरद उघडे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.दक्षा शहा तसेच संबंधित तहसीलदार, परवाना विभागाचे व पोलीस विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
उप आयुक्त सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे
यांनी २३७ प्रमाणपत्र पोर्टलवर रद्द करण्यात आले असल्याची माहिती दिली. परंतु अवैधरित्या प्रमाणपत्र वितरित करणाऱ्या संबंधित डॉक्टर व संबंधित आरोग्य अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देशही महापौरांनी यावेळी दिले. आतापर्यंत ८ जणांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात आली आहे. उर्वरितांवर सोमवारपासून कारवाई करण्याचे निर्देशही महापौरांनी दिले.विलंबित प्रकरणात २१ दिवसांनंतर जन्मप्रमाणपत्र वितरण करण्यात आली असून त्यांची फेर चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.२ वैद्यकीय अधिकारी यांना निलंबित करण्यात आले असून इतरांवर कारवाई करण्याचे निर्देशही दिले.१ जानेवारी २०१६ नंतरचे संपूर्ण दस्तऐवज तपासण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी, माजी खासदार श्री. किरीट सोमय्या यांनी बोगस जन्म प्रमाणपत्र ताब्यात घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
महापौरांनी शहरातील फेरीवाल्यांची नोंद, त्यांचे परवाने, ओळखपत्रे आणि वास्तव्या संदर्भातील कागदपत्रांची तपासणी तात्काळ करण्याचे निर्देश दिले.
मुंबईत फेरीवाला व्यवसाय करणाऱ्यांची आधार कार्ड इतर शासकीय ओळखपत्रांची काटेकोरपणे पडताळणी करण्यात यावी, ज्यांच्याकडे अवैध कागदपत्रे आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, याबाबत महानगरपालिका आणि पोलीस विभाग यांच्यात समन्वय वाढवण्याचे निर्देशही महापौरांनी यावेळी दिले.गेल्या काही वर्षात मुंबईत फेरीवाल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याच्या आणि त्यामध्ये परदेशी नागरिक अवैधरित्या वास्तव्यास राहून व्यवसाय करत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. यामुळे स्थानिक फेरीवाल्यांना आर्थिक ताण वाढण्यासोबतच काही भागात महिलांच्या सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले.फुटपाथवरील गर्दी, अतिक्रमण आणि अनधिकृत व्यवसायामुळे कायदा सुव्यवस्थेचा समस्या निर्माण होत असून या पार्श्वभुमीवर अतिक्रमण हटवून नागरिकांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका
कटिबद्ध असल्याचे महापौर रितू तावडे यांनी यावेळी स्पष्ट केले.त्यासोबतच विविध प्रभागांमध्ये कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले .
……….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here