Home नागपूर *नागपुरात ओबीसी प्रश्नांवर मंथन करणारी महत्त्वाची बैठक ,१७ फेब्रुवारी रोजी नागपुरात होणार...

*नागपुरात ओबीसी प्रश्नांवर मंथन करणारी महत्त्वाची बैठक ,१७ फेब्रुवारी रोजी नागपुरात होणार आंदोलन!*

143
0

‘सकल ओबीसी महामोर्चा’च्या वतीने आयोजित केलेल्या विशेष बैठकीत झाला निर्णय

नागपुरात ओबीसी प्रश्नांवर मंथन करणारी महत्त्वाची बैठक झाली. दि १७ फेब्रुवारी रोजी नागपुरात आंदोलन घेण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.
काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार,यूजीसीचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी या बैठकीला केले मार्गदर्शन
रविवारी झालेल्या या बैठकीला विदर्भातील प्रमुख ओबीसी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते ही उपस्थित होते

जातीनिहाय जनगणनेतील प्रश्न क्रमांक १२ वरून, आजच्या बैठकीत असंतोष व्यक्त करण्यात आला
घरसूची प्रश्नावलीत ओबीसींचा स्पष्ट उल्लेख नसल्याने नाराजी आहे.
जनगणनेत या तांत्रिक त्रुटीमुळे ओबीसी समाजाच्या घटनात्मक हक्कांवर परिणाम होण्याची शक्यता आहे

या पार्श्वभूमीवर पुढील रणनीती ठरवण्यासाठी आजच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली
युजीसीच्या नव्या धोरणांवरही आजच्या बैठकीत चर्चा झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here