Home Uncategorized २७ जानेवारीला बँकांचा एकदिवसीय संप!

२७ जानेवारीला बँकांचा एकदिवसीय संप!

56
0

दि २४ जानेवारी चौथा शनिवार, २५ जानेवारी रविवार आणि २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाची सुट्टी आहे…त्यामुळे २७ जानेवारीच्या बॅक संपामुळे ग्राहकांचे हाल होण्याची शक्यता आहे.
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने निर्णायक लढ्याची घोषणा केली असून, २७ जानेवारी रोजी एकदिवसीय देशव्यापी संप जाहीर केला आहे. २०१० मध्ये बँकर्सनी पाच दिवसांच्या आठवड्याची मागणी तत्त्वतः मान्य करीत दोन शनिवार अर्ध्या दिवसांची सुट्टी रद्द करून उर्वरित दोन शनिवार पुर्ण सुट्टी लागू केली. त्यानंतर ११व्या द्विपक्ष करारात पुन्हा ही मागणी तत्त्वतः मान्य करत उर्वरित दोन दिवसांच्या सुट्टीचा प्रस्ताव सरकारला सादर केला जाईल, असे मान्य केले. पुन्हा १२व्या द्विपक्ष करारात ही मागणी मान्य करत शिफारशीसह अंमलबजावणीसाठी हा प्रस्ताव सरकारला सादर केला जाईल असे सांगितले आणि तसा तो प्रस्ताव सरकारला सादर केला. मात्र गेल्या दोन वर्षांपासून सरकारने अंमलबजावणी झालेलीच नाही असा आरोप करण्यात आलाय. २७ जानेवारीला बँकांचा एकदिवसीय संप

दि २४ जानेवारी चौथा शनिवार, २५ जानेवारी रविवार आणि २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाची सुट्टी आहे…त्यामुळे २७ जानेवारीच्या संपामुळे ग्राहकांचे हाल होण्याची शक्यता आहे…युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने निर्णायक लढ्याची घोषणा केली असून २७ जानेवारी रोजी एकदिवसीय देशव्यापी संप जाहीर केला आहे. २०१० मध्ये बँकर्सनी पाच दिवसांच्या आठवड्याची मागणी तत्त्वतः मान्य करीत दोन शनिवार अर्ध्या दिवसांची सुट्टी रद्द करून उर्वरित दोन शनिवार पुर्ण सुट्टी लागू केली. त्यानंतर ११व्या द्विपक्ष करारात पुन्हा ही मागणी तत्त्वतः मान्य करत उर्वरित दोन दिवसांच्या सुट्टीचा प्रस्ताव सरकारला सादर केला जाईल, असे मान्य केले.
पुन्हा १२व्या द्विपक्ष करारात ही मागणी मान्य करत शिफारशीसह अंमलबजावणीसाठी हा प्रस्ताव सरकारला सादर केला जाईल असे सांगितले आणि तसा तो प्रस्ताव सरकारला सादर केला. मात्र गेल्या दोन वर्षांपासून सरकारकडून अंमलबजावणी झालेलीच नाही. असा आरोप करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here