Home Uncategorized मुंबईकरांनी काँग्रेसवर दाखवलेला विश्वास सार्थ करू, मुंबईकरांच्या प्रश्नावर महापालिकेत आवाज उठवू व...

मुंबईकरांनी काँग्रेसवर दाखवलेला विश्वास सार्थ करू, मुंबईकरांच्या प्रश्नावर महापालिकेत आवाज उठवू व जनतेचे प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करु – खा. वर्षा गायकवाड

63
0

मुबई

महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे २४ नगरसेवक विजयी झाले आहेत. या नवनिर्वाचित नगरसेवकांचा मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी मंत्री आ अस्लम शेख, आ अमिन पटेल, मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस व मुंबई काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, “जनतेने काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवत २४ नगरसेवक निवडून दिले आहेत. अत्यंत विपरित परिस्थितीत काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या निर्धाराने लढले आहेत. आमची संख्या कमी असली तरी मुंबईकरांच्या प्रश्नावर महापालिकेत आवाज उठवतील व जनतेचे प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करतील. मुंबईकरांना चांगले रस्ते, स्वच्छ पिण्याचे पाणी, वाहतुक कोंडीतून सुटका, बेस्ट बसची चांगली सुविधा, प्रदुषणमुक्त मुंबई करायची आहे. महापालिकांच्या विविध संस्थांमध्ये खाजगीकरणाचा सपाटचा सुरु आहे त्यावर बारीक लक्ष ठेवण्याचे काम केले जाईल. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावही अंकुश ठेवण्याचे कामही या नगरसेवकांच्या माध्यमातून केले जाईल, असे खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here