Home Uncategorized *लोकसंख्येवर नियंत्रण हवेच! बाहेरुन येणारे लोंढे थांबवा!* *तरच होणार खरा विकास!*

*लोकसंख्येवर नियंत्रण हवेच! बाहेरुन येणारे लोंढे थांबवा!* *तरच होणार खरा विकास!*

60
0

*निवडणुकीच्या धामधुमीत, रोहिंग्यो, बांगला देशी या विषयावर जोरदार वादंग होतोय.*
*तर कालच्या मुलाखतीत बिहार युपी वरुन भरभरुन येणाऱ्या रेल्वेंवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा आपली भूमिका मांडली.*
*वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या समस्येबाबत हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वारंवार बोलत होते.*

*महाराष्ट्रावर होणारे लोकसंख्येचे अतिक्रमण थांबायलाच हवं,त्यासाठी प्रवेश परवाना हवा ! हे सांगणारे बाळासाहेब द्रष्टेपणाने उपाय सूचित करत होते याची आठवण आपल्याला येतेच.*
*काल आदित्य ठाकरे यांनी, धारावीतील लोकांना असाच प्रश्न विचारला. इथे रहाणारे कोण आहेत?*

*कोणत्या भागात बांगलादेशी घुसखोर आहेत हे शोधून उपाययोजना होणे अपेक्षित आहे.*
*पण महाराष्ट्रात बाहेर च्या राज्यातून होणारे लोकांचे आक्रमण, इथे होत असलेली गटबाजी, आणि या मतदारांचे विविध विभागात होणारे वाढते वर्चस्व याचा विचार धर्म ,जात, पंथ यांच्यापलीकडे जाऊन कठोर कारवाई व्हायला हवी.*
*मुंबई च्या विकासावरचे हे अतिक्रमण हसायलाच हवे. कितीही पाताळ नगर, जमीन पाणी यावरील रस्ते व इतर प्रवास व्यवस्था केली तरी मूळ जमिनीवर होणारे आक्रमण हे जीवघेणे ठरणार आहे.*

*लोकसंख्येवर नियंत्रण हा सगळ्यात ऐरणीवरील विषय आहे.*

*महाराष्ट्रातील लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी शासन आणि प्रशासन विविध पातळ्यांवर प्रयत्न करत आहे. २०२६ च्या ताज्या आकडेवारीनुसार आणि शासकीय धोरणांनुसार, खालील उपाययोजना लोकसंख्या नियंत्रणासाठी महत्त्वाच्या आहेत.*
*कुटुंब नियोजन सेवांचा विस्तार: शासनाकडून ‘मिशन परिवार विकास’ अंतर्गत दुर्गम भागात मोबाइल टीम्सद्वारे गर्भनिरोधक साधने पोहोचवली जात आहेत यामध्ये कंडोम, गर्भनिरोधक गोळ्या (उदा. छाया) आणि इंजेक्शन (उदा. अंतरा) यांचा समावेश आहे .*
*दोन अपत्यांचे धोरण आणि सरकारी निर्बंध: महाराष्ट्रात दोनपेक्षा जास्त अपत्ये असल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यावर निर्बंध आहेत तसेच, अनेक सरकारी योजनांच्या लाभांसाठी ‘दोन अपत्ये’ ही अट अनिवार्य करण्यात आली आहे .*
*आरोग्य सेवांमध्ये सुधारणा: माता मृत्यू दर (MMR) आणि बाल मृत्यू दर (IMR) कमी करण्यावर विशेष भर दिला जात आहे,*
*२०२६ च्या अंदाजानुसार, महाराष्ट्राचा बाल मृत्यू दर दर हजारी १९ पर्यंत खाली आणण्याचे उद्दिष्ट आहे जेव्हा बालके सुरक्षित राहतात, तेव्हा लोक आपोआपच लहान कुटुंबाची निवड करतात.*
*स्त्री शिक्षण आणि सक्षमीकरण: राज्यातील साक्षरता दर वाढवण्यावर भर दिला जात आहे, कारण* *सुशिक्षित महिलांमध्ये प्रजनन दर कमी असल्याचे दिसून येते.*
*महाराष्ट्राचा प्रजनन दर सध्या १.५ पर्यंत खाली आला आहे, जो लोकसंख्या स्थिर करण्यासाठी सकारात्मक आहे.*
*जनजागृती आणि प्रोत्साहन: ‘जागतिक लोकसंख्या दिन’ आणि ‘नसबंदी पंधरवडा’* *यांसारख्या मोहिमांद्वारे कुटुंब नियोजनाचे महत्त्व पटवून दिले जाते.*नसबंदी शस्त्रक्रिया करणाऱ्या लाभार्थ्यांना आर्थिक मोबदलाही दिला जातो.*
● *कायदेशीर अंमलबजावणी*
*बालविवाह प्रतिबंधक कायद्याची कडक अंमलबजावणी केल्यामुळे मुलींचे लग्नाचे वय वाढून जन्मदरावर नियंत्रण येण्यास मदत होत आहे.*
*महाराष्ट्राची लोकसंख्या २०२५-२६ मध्ये साधारणपणे १२.८ ते १२.९ कोटी दरम्यान राहण्याचा अंदाज होता, जन्मदर हळुहळू कमी होत आहे .*
*२०२६-२०२७ मध्ये होणाऱ्या आगामी जनगणनेतून (Census) या उपाययोजनांचे अधिक स्पष्ट चित्र समोर येईल.*

● *पण या अतिक्रमण करण्यावरचा उपाय आधी होणं आवश्यक आहे.*
*हिंदूंना मुलं जास्ती जन्माला घाला सांगण्यात काहीच अर्थ नाही.किमान आपल्या मुंबईसह महाराष्ट्रात!*
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here