पेण
रायगड विभागातील ‘राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटने’ चा वार्षिक स्नेहमेळावा रविवार दि. २८ डिसेंबर रोजी बापुजी देव मंदिर, सावरसई पेण येथे आयोजित करण्यात आला आहे.स्नेह मेळाव्या निमित्ताने येणाऱ्या सेवानिवृत्त सभासदांसाठी *रोटरी क्लब ऑफ पेण च्या माध्यमातुन नेत्र(मोतीबिंदू) तपासणी व सरकारी योजने मार्फत शास्त्रक्रिया* शिबिर आयोजित करण्यात आल्याचे रायगड विभागीय सचिव गजानन पाटील यांनी सांगितले .
स्नेह मेळाव्यासाठी संघटनेचे सरचिटणीस सदानंद विचारे प्रसिद्धी सचिव रत्नपाल जाधव , केंद्रीय कोषाध्यक्ष गणेश वायफळकर व ठाणे विभागाचे खजिनदार रामभाऊ कांबळे,मुंबई विभागाचे सचिव रामदास म्हसकर आदी उपस्थित रहाणार आहेत ,त्यांच्या उपस्थितीत रायगड विभागाची वार्षिक सर्वसाधारण सभा ही होणार आहे.
स्नेह मेळावा व वार्षिक सभे निमित्ताने जेष्ठ नागरिकांची या वयामधील गरज म्हणून मोतीबिंदू तपासणी उपक्रम संघटनेच्यावतीने राबविण्यात येत आहे त्याचा रायगड विभागातील सेवानिवृत्तांनी लाभ घ्यावा.” असे आवाहन गजानन पाटील यांनी केले आहे.



















