Home महिला *येत्या चालू वर्षापासून महिलांसाठी ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप’* — *खा. सुप्रिया सुळे...

*येत्या चालू वर्षापासून महिलांसाठी ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप’* — *खा. सुप्रिया सुळे यांची घोषणा*

109
0

मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप’ सुरू करण्यात आली होती. या शिष्यवृत्तीचे यंदाचे पाचवे वर्ष आहे. ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप’ आता महिलांसाठी सुरु करण्यात येणार आहे.” असे खा. सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “शेती, शिक्षण, सामाजिक परिवर्तन अशा विषयांमध्ये ज्यांना आवड आहे त्यांच्यासाठी ही फेलोशिप असणार आहे. येत्या नव्या वर्षात महिलांसाठी ही फेलोशिप सुरु करण्यात येणार आहे.”
सुप्रिया सुळे म्हणाल्या की,” हे अधिवेशन खुपच कमी कालावधीचे आहे. मला अपेक्षा होती की काही तरी शिकायला मिळेल. विरोधक असलो तरी राज्याचे हीत आम्ही पाहत आहे. पण अपेक्षीत अशी उत्तरे मिळाली नाहीत. राज्याच्या परिस्थितीवर सकारात्मक चर्चा झाली नाही.” असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “राज्यात महिलांवर होणारे अत्याचार हे सातत्याने वाढताना दिसत आहेत. अधिवेशनात हुंडाबळीवर चर्चा होणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही तरी धोरणात्मक निर्णय घ्यायला हवा. सामाजीक परिवर्तनासाठी विरोधी नेत्यांसोबत एकत्र लढलं पाहिजे आणि ही भूमिका सत्ताधारी नेत्यांनी घेतली पाहिजे अशी आमची भूमिका आहे.”असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “गेली ११ वर्षे मोदी सरकार आहे. शक्ती कायदा का पोस्ट होत नाही. हा शक्ती कायदा भारत सरकाराने पार्लमेंटमध्ये आणला तर आम्ही ताकदीने याला पाठिंबा देऊ.” असे सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here