Home Uncategorized *ब्रम्हपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांचे तातडीने निलंबन करावे*

*ब्रम्हपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांचे तातडीने निलंबन करावे*

85
0

*काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांची विधानसभेत मागणी*
*या पोलिस अधिकाऱ्यांविरोधात चौकशी करून कारवाई करण्यात येईल,तोपर्यंत पदावरून हटवण्यात आल्याची घोषणा मंत्र्यांनी केली*

नागपूर
“ब्रम्हपुरी पोलिस स्थानकातील उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव हे भ्रष्ट आहेत.अनेक प्रकरणात त्यांच्यावर आरोप झाले असून चौकशी झाली आहे.या अधिकाऱ्याचे तातडीने निलंबन करण्याची मागणी.
, काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली.

लक्षवेधीच्या माध्यमातून विजय वडेट्टीवार यांनी, ब्रह्मपुरी पोलिस स्थानकातील राकेश जाधव हा अत्यंत नियमबाह्य काम करत आहे.
रात्री गस्तीवर असताना वाळूने भरलेला ट्रक दहा दिवस पकडून ठेवला. ट्रकमालकाशी आर्थिक देवाणघेवाण झाल्यानंतर गुन्हा न दाखल करता ट्रॅक सोडून दिला.ब्रम्हपुरीमध्ये वाळू तस्करांचा धुमाकुळ सुरू असताना हा पोलिस अधिकारी माज करत माझं कोणी वाकड करू शकत नाही अशा आवेशात कारवाया करत आहे. अशा भ्रष्ट अधिकाऱ्याचे तातडीने निलंबन करावे, म्हणून वडेट्टीवार विधानसभेत आक्रमक झाले. गृहराज्यमंत्री कारवाईचे निर्देश देत नसल्यामुळे काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार विधानसभेच्या वेलमध्ये जात कारवाईची मागणी केली.

लक्षवेधीच्या उत्तराला गृहराज्यमंत्री यांनी “सबंधित पोलिसाविरोधात विभागीय चौकशी सुरू असून अहवाल आल्यावर कारवाई करू .”असे आश्वासन दिले.
यावर विजय वडेट्टीवार यांनी आक्षेप घेतला. “जाधव हे जर त्याच पोलिस स्थानकात कार्यरत राहिले तर चौकशीवर परिणाम करू शकतात म्हणून त्यांना त्या पदावरून हटवण्यात यावे ही मागणी केली. तेव्हा गृहराज्यमंत्री यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव यांना तात्काळ त्यांच्या पदावरून हटवण्यात येईल.” असे आश्वासन सभागृहात दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here