Home Uncategorized *‘रस्ता सुरक्षा जनजागृती मोहीमेचा शुंभंकर. ‘ झेब्रु ’ चे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र...

*‘रस्ता सुरक्षा जनजागृती मोहीमेचा शुंभंकर. ‘ झेब्रु ’ चे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते..*

37
0

नागपूर :
रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने परिवहन विभाग, महाराष्ट्र शासन व राज्य रस्ता सुरक्षा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने या मोहिमेचा शुभंकर ‘ झेब्रु ‘ चे अनावरण आज, मंगळवार दि. ९ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २ वाजता नागपूर येथील विधानभवनातील कॅबिनेट हॉल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे व ना. अजित पवार, तसेच विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे व विधानसभेचे अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

यासह महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे, शालेय शिक्षण मंत्री ना. दादाजी भुसे, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंह भोसलें, *परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक,* सार्वजनिक आरोग्य मंत्री ना. प्रकाश आबिटकर व नगरविकास, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण व अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री ना. माधुरी मिसाळ यांचीही कार्यक्रमाला उपस्थिती राहणार आहे.

 

या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यात रस्ता सुरक्षा जनजागृती, नागरिकांचा सहभाग आणि शिस्तबद्ध वाहतूक संस्कृती निर्माण करण्यासाठी व्यापक प्रचार-प्रसार केला जाणार आहे. “सडक सुरक्षा – जीवन रक्षा!” हा संदेश यामाध्यमातून समाजात रुजवण्याचा शासनाचा मानस आहे.

राज्यातील नागरिकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा.”असे आवाहन परिवहन विभागातर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here