Home Uncategorized अर्थकारण आणून निवडणुका जिंकायच्या हाच दृष्टीकोन असेल तर त्यावर भाष्य न केलेलं...

अर्थकारण आणून निवडणुका जिंकायच्या हाच दृष्टीकोन असेल तर त्यावर भाष्य न केलेलं बरं!

44
0

*पैसे, निधीवर मत मागितलं जातंय, ही गोष्ट चांगली नाही*
— राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार *

बारामती
“महायुतीमधील तीन पक्षांमध्ये निधी देण्यावरुन जी काही चढाओढ लागली आहे. हल्ली कामावर मतं मागितली जात नाहीत. मी पैसे देईन, निधी देईन, असे सांगितले जाते. ही काही चांगली गोष्ट नाही. अर्थकारण आणून निवडणुका जिंकायच्या हाच दृष्टीकोन असेल तर त्यावर भाष्य न केलेलं बरं.” असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी बारामती येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
“निवडणुकीत कामावर नाही तर पैसे-निधीवर मत मागितलं जातंय. पैसे किती द्यायचे यासाठी चढाओढ सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी ठिकठिकाणी गट झालेत आहेत. पैसे, निधीवर मत मागितलं जातं आहे, ही चांगली गोष्ट नाही. या निवडणुकीत एका पक्षातील गट दुसऱ्या पक्षासोबत जात आहे. पहिल्यांदाच अनेक ठिकाणी गट दिसून येत आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की या निवडणुकीत एकवाक्यता नाही. पंचायत समिती, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हवा तो योग्य निकाल मतदार घेतील. याआधी आमच्यासारख्यांनी असे प्रयत्न केले नाहीत आता ही करणार नाहीत. मतदानासाठी दोन चार दिवस राहिले आहेत काय होतंय बघूया.”
“अतिवृष्टी आणि पूर याच्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यात अतोनात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान दोन प्रकारचे आहे. काही ठिकाणी जमीन वाहून गेली आहे काही ठिकाणी फक्त साधनं वाहून गेली आहेत. आता राज्य सरकारने जे धोरण ठरवलं त्याच्या पाठीमागच्या कर्जाच्या वसुलीला एक वर्षाच्या साठी स्थगिती दिली आहे. एक वर्षाचा हा वसुली थांबवण्याचा निर्णय तात्पुरता उपयोगी ठरेल, पण त्याची गरज भासणार नाही. शेतकऱ्यांचे जे आर्थिक नुकसान झालं आहे ते पाहिल्यानंतर त्याची काही रक्कम सरकारने द्यायला हवी होती. काही रकमेसाठी व्याज माफ करून विविध हप्ते दिले असते तर शेतकऱ्यांना त्याची आर्थिक मदत झाली असती. आताची सरकारी मदत पुरेशी आहे, असे मला वाटत नाही.”असेही शरद पवार म्हणाले.
पुढे शरद पवार म्हणाले की, “सर्वोच्च न्यायालय काय निकाल देईल सांगता येत नाही. कारण यावेळी ५० % आरक्षणाच्या मर्यादेचे पालन करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाची भूमिका आग्रही दिसत आहे. त्याचा अंतिम निर्णय दोन-तीन दिवसांत होईल, त्याबाबत आताच काही सांगता येत नाही.” असे शरद पवार यांनी बोलताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here