Home Uncategorized *जनसुरक्षा विधेयकाविरोधात खा.सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे आंदोलन*

*जनसुरक्षा विधेयकाविरोधात खा.सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे आंदोलन*

68
0

*हा देश फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालणार*
*नक्षलवाद्यांविरोधात आधीच कायदे असताना याची गरज काय?*

पुणे
जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात पुणे येथे महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष खा. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात “जनसुरक्षा विधेयका’च्या विरोधात आंदोलन करण्यात आले.
सुप्रिया सुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आंदोलनात सहभागी झाल्या.
“सरकारने आणलेला जनसुरक्षा कायदा हा संविधान विरोधी आहे. नक्षलवाद संपवल्याचा दावा सरकार करत आहे, तसेच नक्षलवादासाठी कायदे आधीपासूनच अस्तित्वात असताना नवीन कायदा कशासाठी? असा सवाल उपस्थित करत सरकारने हा कायदा मागे घ्यावा.” अशी मागणी यावेळी खा.सुप्रिया सुळे यांनी केली. याप्रसंगी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

“भारतीय संविधानाचा विजय असो!जनसुरक्षा कायदा रद्द करा! अशा घोषणा करत हे आंदोलन सुरू करण्यात आले. पुण्यात आंदोलनावेळी माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की,” महाविकास आघाडीमध्ये तुम्हाला आठवत असेल;जेव्हा मा. उद्धवज स्वतः असेंब्लीमध्ये आले होते त्यावेळेस काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असेल, आम्ही सगळ्यांनी मिळून हा कायदा आणला होता, तेव्हा सगळ्यांनीच याचा विरोध केला होता. मला एकाच गोष्टीचे आश्चर्य वाटते की;एकीकडे या देशातून नक्षलवाद संपवला असे हे केंद्र सरकार नाहीतर राज्यातील सरकार सांगत आहे. तर मग नक्षलवादाच्या विरोधात आधीच आपल्याकडे कायदे असताना आणखी एक कायदा कशासाठी? असा सवाल खा. सुळे यांनी उपस्थित केला.
खा.सुळे म्हणाल्या की, “सगळ्या समाजात अशी एक चर्चा आहे की हा फक्त की असे कायदे आणून संविधानाच्या विरोधी घेतलेला हा निर्णय आहे. हा देश कोणाच्या मन मर्जी चालणार नाही. हा देश फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालणार आणि म्हणून या विधेयकाचा महाविकास आघाडी म्हणून विरोध तर आहेच, पण जबाबदार नागरिक या नात्याने विरोध करू. आमची विनंती आहे हे विधेयक मागे घेण्यात यावे.”
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकी विषयी
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “गुप्त मतदान असताना मग कसे कळणार की त्यात कोणत्या पक्षाने क्रॉस वोटिंग केले? वायएसआर काँग्रेस हा पक्ष इंडिया आघाडीत नाही. तुम्हाला कसे माहीत आहे की गुप्त मतदान असताना कोणती मते फुटली हे कसे समजेल? असे आरोप जर केले जात आहेत, राहुल गांधी जे म्हणतात ते खरेच आहे वोट चोरी झाली.” असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here